आज जम्मू कश्मीर मधील कुलग्राम इथे आतंकवादी हल्ल्यात अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुका मोरगाव भाकरे येथील प्रवीण जंजाळ जवान शहीद त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,अकोला जिल्ह्यातील जवानांचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मंत्री खाते असताना बाबासाहेबांनी एक करार व्हाईसरॉय सोबत केला होता महार रेजिमेंट पुन्हा स्थापना झाली पाहिजे असा निर्णय बाबासाहेबांनी सर्वप्रथम मांडला आणि त्याच वेळेस दुसरं महायुद्ध याची सुरुवात झाली होती ब्रिटनला सैनिकांचं कमतरता जाणवत होती त्याच वेळेस बाबासाहेबांनी जनता या वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध केली की दुसऱ्या महायुद्धात महार रेजिमेंट ची स्थापना झाली त्यासाठी सैनिक पाहिजे तेच बातमी थेट महाराष्ट्रभर वराळ प्रांत आणि अकोला जिल्ह्यात काकासाहेब जाबुजी शिरसाट यांच्याकडे पत्र आलं आणि त्यांनी पचमढी,आताचा नूतन बौद्ध आखाडा जुना भिम नगरचा आखाडा या ठिकाणी सगळ्यांना दवंडी देऊन पचमळी या ठिकाणी कॉर्नर सभा बोलावली आणि त्या सभेमध्ये संध्याकाळी दिव्याच्या माध्यमातून हे बातमी वाचून दाखवली,अतिशय गुप्त पद्धतीने घरच्यांना न माहीत होता 300 लोक बाबासाहेबांच्या पत्रावर अकोला जिल्ह्यातून महार रेजिमेंटमध्ये दुसऱ्या महायुद्धात सामील झाले त्यात सर्वप्रथम भिमनगर मधले 7 सैनिकांचा समावेश होता आणि सगळ्यात जास्त हे मोरगाव भाकरे या गावांमधील जंजाळ कंपनी होती त्या जंजाळ कंपनीचा हा वारसा ही प्रवीण जंजाळ वीर सैनिक चालवत होते आज त्यांची हल्ल्यात शहीद झाले,खऱ्या अर्थाने या सैनिकाने बाबासाहेबांचा वारसा समोर चालू ठेवला होता.त्यांना सम्राट अशोक सेनेकडून आणि समस्त भिमनगर वासियांच्या वतीने तसेच प्रकाशपर्व न्युज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…
मा.शरद इंगोले, अकोला व बुलढाणा जिल्हा समन्वयक,प्रकाशपर्व न्युज