Homeस्वास्थआयु.विक्रम दिपक गावंडे यांच्याकडून शासकीय रुग्णालय,पालघर ला केले शितकपाट दान.....

आयु.विक्रम दिपक गावंडे यांच्याकडून शासकीय रुग्णालय,पालघर ला केले शितकपाट दान…..

पालघर,दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामीण रुग्णालय,पालघर येथे दिवंगत दिपक हरिभाऊ गावंडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ उत्तम दर्जाचे फ्रिज (शितकपाट) धम्मदान म्हणुन देण्यात आले.सदरील फ्रिजचा वापर पालघर येथील ग्रामीण रुग्णालय,पालघर येणाऱ्या प्रत्येक पालघर वासियांकरीता आवश्यक असणाऱ्या महत्वाचे औषधे,इंजेक्शन्स,वैक्सीन यांसारख्या आवश्यक वस्तु ठेवण्याकरीता होईल असे मा.श्री. डॉ.चंद्रकांत आ.लोहारे साहेब (वैद्यकीय अधिक्षक वर्ग -१,ग्रामीण रुग्णालय,पालघर)यांनी सांगितले आहे.सदर धम्मदान देतांना स्वतः आयु.विक्रम दिपक गावंडे,त्यांची आई आयु.रोशना दिपक गावंडे,आयु.उमेश शशिकांत जाधव त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय, पालघर येथील डॉ.चौधरी सर, डॉ.सुपे सर तसेच इतर रुग्णालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते व सर्व उपस्थित रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी दानदात्यांचे मनःपुर्वक आभार मानले.

पालघर तालुका प्रतिनिधी, सुनील शेलार,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular