उन्हाळा दोन प्रकारचा असतो…
जसे हिवाळा दोन प्रकारचा असतो म्हणजे ऑक्टोबरमध्ये जाणवणारी थंडी ही फक्त फील देणारी असली तरीही त्यात Heat असते जे पित्ताचा काळ म्हणजे शरद ऋतु असतो. तसेच शरीराला ऊन्ह जाणवत असेल तरीही तो कफाचा काळ म्हणजेच वसंत ऋतु असतो.
उन्हाळा हा आधारणपणे दोन ऋतुचा भाग असतो म्हणजे वसंत ऋतु आणि ग्रीष्म ऋतु …
वसंत ऋतु हा जो कफ थंडीच्या काळात जमा झालेले असतो फक्त उष्णता न लागल्याने पातळ झालेला नसतो तो कफ पातळ होऊन कफाचे आजार निर्माण करतो.
वसन्ते निचितः श्लेष्मा दिनकृद्भाभिरीरितः ।
कायाग्निं बाधते रोगांस्ततः प्रकुरुते बहून् ।।
वसंतात जठराग्नि बाधत असल्याने कोणते कोणते आजार होऊ शकतात ह्याचा नेम नसतो बऱ्याच जणांना ह्या काळात शरीरात अनेक तत्व कमी झालेले रक्त , लघवी तपासणीत जाणवतात, थकवा जाणवतो , भूक मंद होत जाते . उन्हात जाऊन आल्यावर चक्कर , डोकेदुखी सुरू होते.
तस्माद्वसन्ते कर्माणि वमनादीनि कारयेत् ।
गुर्वम्लस्निग्धमधुरं दिवास्वप्नं च वर्जयेत् ।।
वसंत ऋतुत वमन आदी पंचकर्म शरीराच्या प्रकृती नुसार करून घ्यावे.
जड पदार्थ , आंबट पदार्थ , तेलकट पदार्थ , गोड पदार्थ , दिवसा झोपणे अपथ्य म्हणून टाळावेत.
व्यायामोद्वर्तनं धूमं कवलग्रहमञ्जनम् ।
सुखाम्बुना शौचविधिं शीलयेत् कुसुमागमे ।।
व्यायाम , कोरडे अभ्यंग उटणे , औषधी वनस्पतींचे धूर घेणे , औषधी काढ्याने गुळण्या करणे , अंजन , शौच विधीसाठी थंड किंवा गरम पाणी न घेता सुखकर हितकर पाणी वापरावे.
वसंतात येणाऱ्या फुलांचा आस्वाद घ्यावा.
चंदन अगरु ह्या वनस्पतींचा लेप लावावा , बार्ली , गहू हे अन्न घ्यावे (ज्यांना मांसाहार जमतो त्यांनी जंगली प्राणी पक्षी ह्यांचे मांस खावे.)
भक्षयेन्निर्गदं सीधुं पिबेन्माध्वीकमेव वा ।
वसन्तेऽनुभवेत् स्त्रीणां काननानां च यौवनम् ।।
ड्रिंक जसे रेड वाईन , यथेच्छ मैथुन करावे व गार्डनींगचा अनुभव घ्यावा.
ह्याकाळात कफ वाढवणारे जसे की दही , लस्सी सारखे स्पर्शाला थंड असणारे पण पोटात गेल्यावर गर्मी निर्माण करणारे पदार्थ सेवन करू नये.
उन्हाळ्याचा दुसरा भाग म्हणजे ग्रीष्म होय…..
मयूखैर्जगतः स्नेहं ग्रीष्मे पेपीयते रविः ।
स्वादु शीतं द्रवं स्निग्धमन्नपानं तदा हितम् ।।
सूर्य ग्रीष्म काळात शरीरातील द्रव भाग , स्नेह भाग पितो त्यामुळे ग्रीष्मात म्हणजे एप्रिल मे काळात गोड , थंड , पातळ , तूप युक्त अन्न सेवन करावे जे हितकर आहे.
जे व्यक्ती…..
शीतं सशर्करं मन्थं ।
घृतं पयः सशाल्यन्नं भजन् ग्रीष्मे न सीदति ।।
थंड , साखरेपासून निर्मित शरबत , तूप , दूध , भात हे सेवन करतो त्यांना ग्रीष्मामुळे थकवा येत नाही.
मद्यमल्पं न वा पेयमथवा सुबहूदकम् ।
लवणाम्लकटूष्णानि व्यायामं च विवर्जयेत् ।।
ग्रीष्म काळात दारू पिऊ नये प्यायची असल्यास अतिपाणी टाकून प्यावे. मिठाचे पदार्थ , आंबट , तिखट , गरम पदार्थ , व्यायाम पूर्णतः टाळावा.
दिवा शीतगृहे निद्रां निशि चन्द्रांशुशीतले ।।
दिवसा थंड घरात आणि रात्री चंद्राच्या शीतल किरणांच्या सहवासात राहावे.
व्यजनैः पाणिसंस्पर्शैश्चन्दनोदकशीतलैः ।
सेव्यमानो भजेदास्यां मुक्तामणिविभूषितः ।।
काननानि च शीतानि जलानि कुसुमानि च ।
ग्रीष्मकाले निषेवेत मैथुनाद्विरतो नरः ।।
चंदन पाण्याने हात पाय धुवावे , त्याचे सेवन करावे.
अंगावर मुक्ता मणी धारण करावेत.
थंड पाण्याच्या सहवासात , गार्डन मध्ये , फुलांच्या सानिध्यात वेळ घालवावा.
जेवढे जमेल तेवढे मैथुन टाळावे ब्रम्हचर्य पालन करावे. अन्यथा थकवा येतो जागेची आग होते.
अश्या पद्धतीने उन्हाळा एन्जॉय करावा.
सोबत ते शास्त्रोक्त स्नेहन , स्वेदन करून पंचकर्म करावे. कोणत्याही प्रकारचे ताक पिऊन पंचकर्म , किंवा दही , लस्सी थंड असते ह्या भावनेत राहून शरीरात उष्णता वाढवून घेऊ नये.
(दही खायचे सुद्धा नियम आहेत त्या नियमाने आपल्या प्रकृतीनुसार दही सेवन करता येते. – आयुर्वेद निरोगी शरीर असेल तर त्याला सांभाळून Life Enjoy करायला आणि रोगी असताना नियम पाळून निरोगी लवकरात लवकर होऊन Life Enjoy करायला सांगतो. )
टीप : लेख आवडल्यास share करावा. आपले लेखासंबंधी काही प्रश्न असतील तर 7030860104 या नंबरवर विचारावेत.
डाॅ.रुचि हुमने
संपर्क -7030860104
(गोंदिया जिल्हा)