नाशिक येथे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणादिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सदर कार्यक्रमात नाशिकमधील साहित्यक, वाचक, स्पर्धा परीक्षेचे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावना आणि सुत्रसंचालन विश्वस्त असे रविकांत शार्दूल यांनी केले होते.याप्रसंगी कवी रविकांत शार्दूल,कवी पंढरी पगारे, श्री लोणारी आणि डॉ.अशोक पगारे यांनी आपल्या मनोगतातून डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जिवनकार्याला उजाळा दिला.यावेळी ग्रंथपाल विलास नलावडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
नाशिक प्रतिनिधी डाॅ.अशोक पगारे (प्रकाशपर्व न्युज)