पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा येथे जातीय भावनेतून वाद उकरून रमाकांत सोनवणे या तरुणास गावातील काही समाजकंटक, गावगुंडांनी घरात जावून त्यांना व त्याच्या भावाला लाथाबुक्क्याने मारझोड करत डोंक्यात लोंखडी रॅाड, हतोडी मारून जिवेठार मारण्याचा प्रयत्न करत डोके फोडून गंभीर दुखापत केली.
सदर घटनेची गंभीरता पोलिसांनी लक्षात न घेता ३ दिवसांपासून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात करण्यात आली म्हणून पिंडीत कुटुंबातील सदस्य व गावातील समाज बांधव यांना सदर घटनेची माहिती समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष आयु.किशोर डोंगरे यांना दि.22 जुन रोजी रात्री 9 वा.फोन करून सांगितल्यावर आज दि.23 जुन रोजी सकाळी ११ वाजता पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे जिल्हा सहसचिव पिंटू सावळे पाचोरा व स्थानिक स.सै.दलाचे सैनिक यांना सोबत घेवून
सदर घटनेची गंभीरता वरिष्ठ पोलिस अधिकारी डी.वाय.एस.पी.येरुळे
साहेब यांच्या निर्देशनांत स्थानिक सहाय्यक पो.नि.अमोल पवार साहेब यांच्या फोनव्दारे आणून दिली स्थानिक पो.स्टेशनचे पी.आय.काळे साहेब रजेवर आल्यामुळे भडगाव येथील प्रभारी पी.आय.पालकर साहेब यांना भडगाव येथून बोलून जिल्हाध्यक्ष व सैनिक तब्बल 4 तास पिंपळगाव हरे पोलिस स्टेशन येथे ठिय्या मांडून (थांबून) संबंधितावर अरोपीवर भा.द.सहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून पिंडीत कुटुंबाला न्याय मिळवून दिला.
सदर प्रकरणावर समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष मा.नानासाहेब धर्मभुषण बागुल यांचे मार्गदर्शन घेवून,वरील अन्यायकारक घटनेवर पूर्ण लक्ष देवून शेवट पर्यत लढा देवून न्याय मिळवून देण्यास स.सै.दल कटिबंध आहे.असे आश्वासन जिल्हाध्यक्ष आयु.किशोर डोंगरे यांनी पिडीत कुटुंबाला देवून पिडीताचे मनोबल वाढविले.
मा.सचिन बार्हे,जळगाव जिल्हा समन्वयक,प्रकाशपर्व न्युज