Homeप्रदेशनालंदा बौद्ध विहार,सफाळे,विराथन खु.येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने रेलीचे आयोजन

नालंदा बौद्ध विहार,सफाळे,विराथन खु.येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने रेलीचे आयोजन

रविवार दिनांक ११/०८/२०२४ रोजी सफाले,विराथन खुर्द येथील पंचशील मित्रमंडळ,नालंदा महिला मंडळ आणी ग्रामपंचायत विराथन खुर्द यांच्या विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प “नालंदा बुद्ध विहार” येथे पंचशील मित्रमंडळाचे अध्यक्ष/माजी श्रामनेर आयु.सुभाष भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी मंगलमय वातावरणात मंगलमैत्री रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात रॅलीत सहभाग घेतला.वर्षावास कार्यक्रमाचे अवचित्त साधून पंचशील मित्रमंडळाचे अध्यक्ष आयु.सुभाषभाऊ गायकवाड आणी ग्रामपंचायत विराथन खुर्द सरपंच आयुनी.राजश्री किणी मॅडम यांच्या हस्ते ग्रामस्थ तसेच सर्व बौद्धाचार्य यांच्या उपस्थित “नालंदा बुद्ध विहाराचे उदघाट्न” करण्यात आले.उपसरपंच आयु.दिपक जगन्नाथ गायकवाड यांनी उत्तम सुत्रसंचलन करून उपस्थित मान्यवरांचे/विशेष अतिथी यांचे पुष्प देऊन स्वागत केले.प्रसंगी जेष्ठ बौद्धाचार्य/केंद्रीय शिक्षक/समता सैनिक माजी पालघर तालुका अध्यक्ष आद.आयु.श्रीपाद शेलार गुरुजी यांनी “सिगाल सुत्त – मानवाची कर्तव्य” या विषयावर उपस्थित उपासक/उपासिका, धम्म बांधव यांना सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमासाठी बोईसर विभाग शाखा येथून बोईसर विभाग शाखेचे अध्यक्ष आयु.विजय मोरे गुरुजी, आयु.राजेश लोखंडे गुरुजी,आयु.नरेश म्हस्के गुरुजी,आयु.रवींद्र दिवे गुरुजी,आयु.प्रकाश गायकवाड गुरुजी,आयु.बळवंत लोखंडे गुरुजी,आयु.रुपेश भोणे गुरुजी,आयु.विकास भोणे गुरुजी यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच सफाळे येथून बौद्धचार्य आयु.उदय मोहिते गुरुजी,आयु.अनिल जाधव गुरुजी,माजी श्रामनेर आयु.काळे गुरुजी,आयु. परशुराम गायकवाड गुरुजी,माजी सरपंच आयु.जयवंत किणी तसेच जेष्ठ नागरिक उपस्थीत होते.बौद्धाचार्य आयु.विकास भोणे गुरुजी यांनी वर्षावास कार्यक्रमाचे अवचित्त साधून उपस्थित उपासक/उपासिका यांना “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शेवटची भाषणे,धम्मेय स्तुपाच्या सावलीत” या पुस्तकाचे वाटप केले.बौद्धाचार्य आयु.प्रकाश गायकवाड गुरुजी यांनी उपस्थितांना बौद्धांची पवित्रस्थळे या बद्दल उत्तम माहिती दिली व गायकवाड परिवाराकडून खीर दान केले.बोईसर विभागाचे अध्यक्ष आयु.विजय मोरे गुरुजी यांनी आपल्या गाण्यातून प्रबोधन केले,तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.सुभाष भाऊ गायकवाड यांनी आपले अध्यक्षीय भाषण केल्यानंतर आयु.दिपक गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले व शेवटी सरणंत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पालघर तालुका प्रतिनिधी,सुनिल शेलार,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular