Homeप्रदेशपाचोरा (जळगाव जिल्हा) येथे समता सैनिक दलाच्या ९७ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य...

पाचोरा (जळगाव जिल्हा) येथे समता सैनिक दलाच्या ९७ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली संपन्न……

राष्ट्रनायक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पहिल्या लढाऊ संघटनेचा म्हणजेच समता सैनिक दलाचा 97 वा वर्धापन दिन चाळीसगांव जिल्हा जळगाव येथे भव्य बाईक रॅली काढून साजरा करण्यात आला.
राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांचे नेतृत्वात निघालेल्या या बाईक रॅलीचे आयोजन चाळीसगांव तालुका शाखेने केले होते.
जिल्हा सचिव नितीन मरसाळे , जिल्हा संपर्क प्रमुख भाईदास गोलाईत यांचे सह तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव ,सचिव सचिन गांगुर्डे, ज्येष्ठ कार्यकर्ते स्वप्नील जाधव, उपाध्यक्ष जीवन जाधव, सौ.सोनालीताई लोखंडे,तालुका संपर्कप्रमुख मनोज जाधव, सौ.मायाताई अहिरे,अभिजित निकम,वाल्मीक अल्हाट,यशवंत दाभाडे,महेंद्र निकम,शिवाजी शिंदे,रवींद्र जाधव,सदाशिव कदम, मुकेश जाधव,ऍड.तुषार पाटील,बाबा पगारे,विशाल पगारे,सीताराम जाधव,राहुल गुजर,अमजद खान, गफ्फार शाह,भैय्या बागुल,नितीन जवराळे ,मयुर बागुल, गणेश अहिरे ,अजय खालकर, रतन अहिरे , विश्वजित जाधव , राहुल राखुंडे, आकाश कसबे, करण राखपसरे , कुणाल अहिरे धनंजय अहिरे , अवधेश बागुल , घनशाम बागुल यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांनी ही रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


शेकडोच्या संख्येने मोटार सायकल घेवून युवा तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते या रॅलीत सामील झाले होते.
दै.ग्रामस्थ चे संपादक , फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक मा.किसनराव जोर्वेकर या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते झेंडा फडकवून रॅलीस रेल्वेस्टेशन येथून प्रारंभ करण्यात आला.
ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र जाधव , ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम जाधव , देविदास तात्या जाधव , वसंत मरसाळे , सोमनाथ गायकवाड , रमेश भारती भाऊसाहेब , अनिल पगारे भाऊसाहेब , किरण खैरे भाऊसाहेब , बाबुलाल शिरसाठ भाऊसाहेब यांचे सह अनेक ज्येष्ठांनी सहभाग दिला.


शहराचे प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली निघाली व समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यालय येथे विसर्जित झाली.
रॅली विसर्जित करतांना धर्मभुषण बागुल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यथोचित मार्गदर्शन केले.जिल्हा सचिव नितीन मरसाळे यांनी आभार मानले.

मा.सचिन बार्हे
जळगाव जिल्हा समन्वयक
(प्रकाशपर्व न्युज)
संपर्क-7066668723

RELATED ARTICLES

Most Popular