पालघर,पालघर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 11 खाणपाडा येथील लालसा किराणा स्टोर ते लक्ष्मणवाडी पर्यंत गटारी व रस्ते बांधकाम हे दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी पालघर नगरपरिषद अंतर्गत सुरु करण्यात आले होते,पण हे काम आजपर्यंत पुर्ण झाले नसून अर्धवट व अगदी निकृष्टदर्जाचे निधी इंटरप्राईजेसचे ठेकेदार आदित्य संखे यांनी केलेले आहे,हे काम करत असतांना त्यांनी कुठल्याही प्रकारचे अंदाजे खर्चाचा फलक किंवा कामाचा स्वरूप याठिकाणी लावलेला नाही,तसेच गटारीचं काम करत असताना कुठल्याही प्रकारची लेव्हल न काढल्यामुळे व पाण्याचा निचारा होत नसून गटार पुर्णपणे सांडपाण्याने भरलेले राहते.त्यामुळे हे पाणी जागेवरती झिरपत असुन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये व नागरिकांच्या बोरवेलमध्ये गटाराचे पाणी येत आहे यामुळे समस्त परिसरात दुर्गंधींचे वातावरण पसरले असून खाणपाडा प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.येथील नागरिक हे सतत नगरपरिषद कार्यालय व जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे लेखीतक्रार अर्ज केले असता आतापर्यंत नाममात्र नोटिस काढण्यात येतात पण कारवाई केलेली नाही व नागरिकांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळवून दिला नाही.आजसुद्धा गटार पूर्णपणे सांडपाण्याने भरलेले आहे.ज्याची पालघर नगरपरिषद यांनी तत्काळ दखल घ्यावी निधी इंटरप्राईजेस यांच्यावरती कारवाई करून लवकरात-लवकर गटार व रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यावे ही पालघर प्रभाग क्रमांक 11 च्या समस्त नागरिकांनी मागणी केलेली आहे,अन्यथा पालघर प्रशासनाअंतर्गत योग्य असा न्याय न मिळाल्यास तीव्र-आंदोलन करण्यात येईल व त्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालघर प्रशासनाची राहील असे यावेळी तेथील स्थानिकांनी इशारा दिला.
पालघर तालुका प्रतिनिधी,सुनिल शेलार,प्रकाशपर्व न्युज