Homeराजनितिपालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीच्या शेकडो पदाधिकारी...

पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला वंचित बहुजन आघाडी मध्ये भव्य पक्ष प्रवेश

दि.19/02/2024 रोजी रमाबाई आंबेडकर नगर,बोईसर(पालघर, येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे पालघर वंचित बहुजन आघाडी चे पालघर जिल्हाध्यक्ष मा.शिवविलासजी सोनकांबळे साहेब यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.


या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मा.रत्नदीप पाखरे साहेब,मा.संजय ढोके साहेब, जिल्हा महिला अध्यक्ष सौ. वैजयंतीमाला सोनकांबळे मॅडम,(जिल्हा सचिव) मा.विवेक राऊत साहेब,डहाणू (तालुका उपाध्यक्ष) मानकर साहेब,शहर अध्यक्ष मा.राहूल झाल्टे साहेब व इतर पदाधिकारी हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बहुजन समाज पार्टीचे जेष्ठ पदाधिकारी मा.बळीराम कसबे सर,मा.सचिन भोसले सर व इतर शेकडो कार्यकर्त्यानी वंचित बहुजन आघाडीत जिल्हाध्यक्ष समक्ष भव्यदिव्य असा पक्षप्रवेश केला.

RELATED ARTICLES

Most Popular