Homeबड़ी खबरेबिगरमोसमी पाऊसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून अकोला जिल्हाधिकारी मा.अजित कुंभार यांनी दिले...

बिगरमोसमी पाऊसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून अकोला जिल्हाधिकारी मा.अजित कुंभार यांनी दिले तत्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश……

अकोला, दि. 27 : जिल्ह्यात बिगरमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिगरमोसमी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे झालेल्या नुकसानाची जिल्हाधिका-यांनी पाहणी केली. अकोला तालुक्यातील वल्लभनगर, निंभोरा, कासली आदी गावांतील शेतीक्षेत्राची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, इतर अधिकारी व परिसरातील शेतकरी बांधव हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जिल्ह्यात बिगरमोसमी काही ठिकाणी गहू, हरबरा, कांदा तसेच इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्याची दखल घेऊन जिल्हाधिका-यांनी तत्काळ शेतीक्षेत्रात जाऊन पीक नुकसानाची पाहणी केली, नुकसानाबाबत कृषी, महसूल विभागांनी तत्काळ पंचनामा करून अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक बाबीची काळजीपूर्वक नोंद घ्यावी व कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.यावेळी जिल्हाधिका-यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

मा.शरद इंगोले
अकोला,बुलढाणा जिल्हा समन्वयक
मो.नं-9689211382

RELATED ARTICLES

Most Popular