डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार बहाल केला. त्या अधिकाराचा वापर योग्य करून जनतेने सत्ता हस्तगत करण्यासाठी पुढे यावे.यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या हाकेला ओ देऊन वंचितांनी सत्ता प्राप्तीसाठी वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील व्हावे. असे विशाखाताई सावंग यांनी गोंधनापूर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या ग्राम शाखा उद्घाटन प्रसंगी सांगितले.
नुकतीच गोंधनापूर येथे वंचित बहुजन महिला आघाडीची ग्राम शाखा गठीत करण्यात आली. गावागावात ग्रामशाखा स्थापन करण्याचा धडाका विशाखाताई सावंग यांनी लावला आहे. पक्षाच्या अध्यक्षपद मिळाल्यापासून त्यांनी स्वतःला वंचित बहुजन आघाडी पक्षासाठी झोकून देऊन,घराघरातून महिलांना एकत्र करून पक्ष कार्य करण्यासाठी प्रेरित केले आहे. किंबहुना महिलांना पक्षाच्या कामासाठी जोडणे सर्वात कठीण कार्य आहे.तरिसुद्धा त्यांनी मोठ्या हिमतीने आणि कार्य-कुशलतेने ते आव्हान सहज स्वीकारले आहे.कधी नव्हे एवढी महिलांचे संघटन त्यांनी तयार केले.त्यामुळेचं जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच महिला मोठ्या उत्साहाने आणि तत्परतेने वंचित बहुजन महिला आघाडी मध्ये सक्रियपणे कार्य करतांना दिसून येत आहेत.प्रत्येक गावात ग्राम-शाखा उद्घाटन प्रसंगी भव्य-दिव्य असे त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.त्यामुळे निश्चितपणे महिलांना वंचित बहुजन महिला आघाडीत कार्य करण्याची ओढ निर्माण झाली आहे.पुढील काळात नक्कीच याचा राजकीय फायदा सत्तेची चाबी आपल्या हातात घेण्यासाठी नक्कीच होणार आहे.
ग्रामशाखा उद्घाटन प्रसंगी मा.संगीताताई गवारगुरु (तालुकाध्यक्ष),मा.इंदुताई वानखडे (तालुका-उपाध्यक्ष),मा.पुष्पाताई इंगळे (तालुका-उपाध्यक्ष),तसेच गोंधनापूर येथील ग्राम शाखा अध्यक्ष मा.मंगलाताई तायडे,महासचिव मा.रेणुकाताई तायडे,उपाध्यक्ष मा.संगीताताई तायडे ,मा.सविताताई तायडे ,मा.सोनालीताई तायडे, मा.रत्नप्रभाताई तायडे,सचिव म्हणून मा.अश्विनीताई तायडे,मा.जयश्रीताई तायडे ,मा.मीनाताई तायडे,मा.सोनूताई तायडे,मा.निवेदिताताई बोदडे,मा.वनमालाताई पहूरकर, संघटक म्हणून मा.सविताताई तायडे, मा.आम्रपालीताई तायडे ,मा.ज्योतीताई प्रदीप तायडे, मा.ज्योतीताई अनिल तायडे, तसेच सदस्य म्हणून मा.सिंधूताई तायडे ,मा.संगीताताई तायडे,मा.वंदनाताई तायडे,मा.शीलाताई तायडे ,मा.ललिताताई तायडे, मा.लताताई वानखडे ,मा.आशाताई तायडे,मा.रेखाताई तायडे,मा.कांताताई तायडे,मा.मैनाताई तायडे,मा.नंदिनीताई तायडे,मा.मंगलाताई तायडे,मा.सुमनताई तायडे ,मा.शोभाताई तायडे,मा.कोमलताई वानखडे, मा.आचलताई तायडे ,मा.मनीषाताई तायडे,मा.भारतीताई तायडे ,मा.सुनिताताई तायडे ,मा.वैशालीताई तायडे,मा.सुरेखाताई तायडे ,मा.मंगलाताई तायडे ,मा.सुशीलाताई तायडे,मा.रंजनाताई तायडे ,मा.लक्ष्मीताई तायडे,मा.रमाताई तायडे,मा.मैनाताई तायडे ,मा.सीमाताई तायडे,मा.मंगलाताई तायडे ,मा.कविताताई इंगळे,मा.कमलताई बाभुळकर, मा.अन्नपूर्णाताई तायडे,मा.मीनाताई तायडे,मा.दिव्यांनीताई तायडे, मा.शालिनीताई तायडे,मा.ज्योत्सनाताई तायडे, मा.कुसुमताई बोदडे इत्यादी सह असंख्य हजारो महिला उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित होते.