सल्ला देणे सोपे काम आहे…!!
आजकाल सोशल मीडियावर सल्लागारांचं पिक आलं आहे तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन करणारे काही सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि काळजीवाहू समाजहितैषी मित्रांचे युती संदर्भातील सल्ले ऐकले म्हणून हा लेखन प्रपंच….!!
आपल्या देशात जात केंद्रित आणि धर्म धार्जिणे राजकारण आहे. अशा पार्श्वभूमीवर,
वंचितांच्या हक्क अधिकारासाठी राजकीय पक्ष स्थापन करणे आणि तो चालविणे किती कठीण काम आहे हे भारतीय राजकारणाचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना चांगले ठाऊक आहे….!!
सरंजामी मानसिकता असलेल्या जात दांडग्यानी महाराष्ट्रात सेक्युलर असल्याचा ढोंगी बुरखा पांघरलेला आहे आणि त्या बुरख्या आडून त्यांनी महाराष्ट्रात घराणेशाही मजबूत केली आहे, हा लोकशाहीच्या नरडीला नख लावण्याचा प्रकार आहे….!!
हा संविधान कुरतडून, कुरतडून संपविण्याचाच प्रकार आहे…!!
एका बाजूला संविधान संपवितो असे स्पष्ट बोलणारा भाजपा आहे तर दुस-या बाजूला संविधान कुरतडून कुरतडून संपविण्यारे ढोंगी घराणेशाही वाले आहेत, दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत….!!
दोन्ही संविधानाचे विरोधक आहेत, एक जण ऊघडं बोलतो आपणं त्याला शत्रू ठरवून टाकले, परंतु जो छूपे पणाने संविधान संपवित आहे, त्याच्या बद्दल आपली भुमिका काय.???
छूपे पणाने जे संविधान कुरतडतं आहेत त्याच्यासाठी काही प्रश्न उपस्थित होतात, कृपया युती करा म्हणून सल्ले देणाऱ्या मित्रांनो पुढील प्रश्नांवर योग्य ती भुमिका घेऊन मग निर्णयाप्रत या…!!
केसाने गळा कापणाराशी दोस्ती करावी का.??
विश्वासघात करणारा सोबतं युती करावी का.??
पाठित खंजीर खुपसणारा सोबतं घरोबा करावा का.???
संविधान वाचविण्याच्या सबबी खाली संविधान संपविणा-या छूप्या संविधान द्रोही ला मिठी मारावी का.???
कुणीही अनुभवी सुज्ञ माणूस वरील प्रश्नांच्या ऊत्तरात नकारच देईल यात तिळमात्र शंका नाही…!!
तरीही दगडापेक्षा विट मऊ या न्यायाने मविआ सोबतं युती करावी असे ठरवून पुढे जातांना एक प्रस्ताव अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी मांडला की, लेखी हमी द्या तर मविआ ने वाटाघाटी बंद करून टाकल्या हे कशाचे लक्षणं आहे.??? हे मविआ मधील सरंजामी वृत्तीचे लक्षणं आहे…!!
कुठलीही अट न घालता बिनबोभाट आमच्या सोबतं या, आम्ही तुमची फरपट करु ही मविआ मधील सरंजामी नेतृत्वाची मानसिकता आहे…!!
देशातील प्रस्थापित सवर्ण राजकीय पक्षांनी अर्थात भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने दलित, ओबीसी,आदिवासी, अल्पसंख्याक समुहाचे राजकीय पक्ष ऊभेच राहू दिले नाही…!!
त्याच न्यायाने कॉंग्रेस आणि भाजपाला महाराष्ट्रात वंचित बहूजन आघाडी ऊभीचं राहू द्यायची नाही ही खरी मेख आहे….!!
वंचित बहूजन आघाडी चे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी १९८३ साली भारिपची स्थापना केली त्यांना राजकीय पक्ष चालविण्याचा ४० वर्षाचा अनुभव आहे. आणि युती आघाडीचा सुद्धा अनुभव आहे…!!
१९९९ साली देशाच्या मध्यावधी लोकसभा आणि महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या…!!
१९९९ साली अॅड बाळासाहेब आंबेडकरांचा भारिप बहूजन महासंघ आणि कॉंग्रेस पक्षाची महाराष्ट्रात युती होती…!!
युती मध्ये एकत्र निवडणुका लढल्या विधानसभेमध्ये भारिप बहूजन महासंघाचे तीन आमदार निवडून आले. १) डॉ. डी. एम. भांडे बोरगाव मंजू (अकोला.) २) रामदास बोडखे अकोट (अकोला.) ३) वसंत सुर्यवंशी साक्री. (धुळे.)
युतीमुळे महाराष्ट्रात लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप बहूजन महासंघ हे तीन पक्ष सहभागी होते.कॉंग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले…!!
कॉंग्रेस पक्षाने युती मधील भारिप बहूजन महासंघाचे
१) मखराम पवार (कॅबिनेट मंत्री.)
२) डॉ. डी. एम. भांडे.( कॅबिनेट मंत्री.)
३) रामदास बोडखे. (राज्य मंत्री.)
४) वसंत सुर्यवंशी (आमदार. )
या ४ लोकांना फुस लावली पळविले, आणि कॉंग्रेस मध्ये सामावून घेतले, भारिप बहूजन महासंघाच्या पाठित खंजीर खुपसला. विधिमंडळातील भारिप बहूजन महासंघाचे अस्तित्व संपवून टाकले.
भारिप बहूजन महासंघाचा विश्वासघात केला. आंबेडकरी मतदारांचा केसाने गळा कापला. नव्हे महाराष्ट्रातील आंबेडकरवादी विचारधारेचे राजकारण संपविण्याचा कुटील डाव खेळला गेला हा अनुभव आहे….!!
हा स्वतः ला सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने दिलेला अनुभव आहे….!!
डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉंग्रेस पक्षाला “जळतं घरं ” म्हणाले होते, २००० साली कॉंग्रेस पक्षाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला राजकारणातून संपविण्यासाठी दिलेला हा अनुभव आहे.कॉंग्रेस पक्षाच्या मानसिकते मध्ये कवडीचाही फरक पडला नाही….!!
आजही कॉंग्रेस प्रणित मविआ म्हणते बिनबोभाट आमच्या पाठिमागे फरपटतं या आम्ही देऊ तेवढ्या जागा घ्या. कुठलीही अट नको, बंधन नको, आम्ही सरंजामी वृत्तीने वागू आमचा पक्ष वाढवू, वेळ आली की,तुमचा पक्ष संपवून टाकू….!!
पुणे कराराच्या वेळची म. गांधी यांची वृत्ती आणि आजच्या मविआ ची वृत्ती यात तसूभरही फरक पडलेला दिसत नाही…!!
आंबेडकरवादी मित्रांनो शांत डोक्याने विचार करा.
४० वर्षे अनेक आरोप झेलतं आणि प्रचंड कष्ट ऊपसुन अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी हा राजकीय पक्ष ऊभा केला आहे, त्यासाठी त्यांनी पराकोटीचा त्याग सुद्धा केला आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे, की, अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना निर्णय घेऊ द्या,त्यांचा अनुभव दांडगा आहे, तुम्ही सल्ले देऊ नका….!!
लेखक:-
प्रा.भाष्कर भोजने
(राज्य सल्लागार-फुले,शाहु,आंबेडकर विद्वत महासभा)
मो.नं-9960241375