साकोली तालुक्यात विर्शिला जात असताना टोल नाका कडून जावे लागते व टोल नाक्याचे पैसे भरावे लागतात म्हणून काही लोक विशीं जाणारा बायपास रस्ता हा शॉर्टकट असून त्या रस्त्याने जास्तीत जास्त लोक जात असतात गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याची गिट्टी निघालेली आहे व चालने अतिशय कठिण झाले आहे.रात्रीला अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तिथे लाईटची व्यवस्था नाही.प्रतिनिधि यांनी त्या रस्त्याला भेट दिली असता रस्ता अतिशय दैनंदिन अवस्थेत दिसला. त्यामुळे रस्त्याचे खडीकरणावर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी.जी रंगारी, जगदीश रंगारी,तालुका महासचिव शीतल नागदेवें,संघटक प्रतीक मोटघरे,यादवराव गणवीर , गणेश गजभिये, मनीषा खांडेकर, नम्रता राऊत व इतर कार्यकर्त्यांनी केलेली आहे.
भंडारा जिल्हा समन्वयक, राकेश वंजारी,प्रकाशपर्व न्युज