दिल्ली दि.१६ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या आणि भारतीय कायद्याच्या इतिहासातला आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि तितकाच धाडसी निंर्णय घेतला आहे. आजपर्यंत न्यायालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असायची.पण आता सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड ( धनंजय चंद्रचूड ) यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच लायब्ररीतील न्यायदेवतेच्या हातात आता तलवारीऐवजी संविधान असणार आहे.या निर्णयामागे न्यायालयात आणखी डोळस पध्दतीने न्याय देण्याचा उद्देश असल्याची माहिती समोर येत आहे.भारतातील न्यायव्यवस्थेचं अत्यंत महत्वाचं प्रतीक असलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याचं स्वरूप मोठा बदल करण्यात आला आहे. आता न्यायदेवतेच्या डोळ्यावर असलेली काळी पट्टी हटवण्यात आली आहे. तसेच यापूर्वी ज्या हाती तलवार होती, त्याऐवजी न्यायदेवतेच्या हाती संविधान दिसून येत आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवा पुतळा बसवण्यात आला आहे.सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने लायब्ररीत काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेल्या पुतळ्याद्वारे न्याय हा आंधळा नसतो असा स्पष्ट संदेश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी न्यायदेवता ही तलवारीऐवजी संविधानाच्या (Constitution) आधारे काम करतो हेही दाखवण्याचा प्रयत्न या पुतळ्याद्वारे केला असल्याचंही बोललं जात आहे.
ठाणे जिल्हा प्रतिनिधी,अनिल भगत, प्रकाशपर्व न्युज