तथागत बुध्द आणि त्यांच्या संघासाठी जगातली सर्वात महागडी जागा खरेदी केली गेली ,ही एक ऐतिहासिक सत्य घटना आहे …. ‘श्रावस्ती’ नगरातील व्यापारी ‘सुदत्त’ हा राजगृह येथे आपल्या जावायाकडे पाहुणा म्हणून आला होता .त्याने आपल्या जावयाकडील उडालेली धांदल बघितली . याचे कारण विचारले असता,भोजनासाठी तथागत बुध्द हे आपल्या भिक्खू संघासह येणार होते . भोजनानंतर तथागतांनी दिलेले प्रवचन ऐकून सुदत्त फारच प्रभावित झाला .तथागत श्रावस्तीला वर्षावासाठी आलेच पाहिजेत ही त्यांच्या मनातली तीव्र इच्छा त्याने बोलून दाखवली .तथागतांच्या वर्षावासासाठी वस्तीपासून दूर नको आणि जास्त जवळही नको अशी निसर्गरम्य जागा असली पाहीजे ,हे त्याला कळले . अशी जागा श्रावस्तीमध्ये राजकुमार ‘जेत’ याची होती . तो जेत कुमार जमीन विकायलाच तयार नव्हता . त्याचेशी खरेदी – विक्रीची चर्चा सुरू असतांना जेत कुमाराला सुदत्ताने शब्दात पकडले ..जेत कुमार निग्रहाने अतिशयोक्तीने बोलला की ..” जर ह्या जमिनीवर सोन्याची नाणी पसरून ठेवशील तरच तुला मी ही जमीन देईल …” तो शब्द प्रमाण मानून सुदत्ताने तात्काळ शेकडो बैलगाड्यांमध्ये, गोण्या भरभरुन सोन्याची नाणी आणली ,आणि त्या जमिनीवर ती नाणी पसरुन तब्बल साडे चौदा एक्कर जमीन खरेदी केली.ही जगातली सर्वात महागडी खरेदी आहे .ह्या खरेदीचा तो प्रसंग भरहूत येथील स्तुपावर शिल्परुपाने कोरण्यात आलेला आहे .. 🔹 या शिल्पात बैलगाड्या भरुन नाणी आणून जमिनीवर पसरण्याचे काम करणारे मजूर व सुदत्त दिसत आहे .एक नोकर पाण्याची सुरई घेऊन उभा आहे ,. व्यवहार पुर्ण झाल्यावर दोघांच्याही हातावर जल शिंपडण्यात येत असे असा तत्कालीन प्रघात होता .त्याशिवाय कोणताही व्यवहार किंवा दान सफल होत नसे .मागे जेत कुमार व त्याचे सेवक सुदत्ताकडे आश्चर्यचकित होऊन बघत आहे .जेत कुमारने तर आपली बोटे तोंडातच घातलेली आहेत .. या शिल्पाच्या खाली तत्कालीन लिपीत एक वाक्यच कोरलेले आहे .त्या वाक्यावरुन सुस्पष्ट अर्थबोध झालाय की हा व्यवहारात किती नाणी खर्च झाली .. आणि नाणी कशा पध्दतीने जमिनीवर पररुन नाण्यांनी ती सर्व जमीन आच्छादली गेलीय ….. 🔹 सोन्याची तब्बल अठ्ठ्यात्तर कोटी नाणी त्या संपूर्ण जमीनच्या भू-खंडावर पसरण्यात आली होती .अठ्ठ्यात्तर कोटी सुवर्ण नाणी ह्या कामी खर्च झालीत .एक एक सुवर्ण नाणे (कार्षापण ) हे एक तोळ्याचे होते .अशी काही नाणी त्याच ठिकाणी उत्खननात मिळालेली आहेत .अठरा कोटी नाण्याचे तत्कालीन मुल्य किती असेल , आणि आज त्याचे मूल्य किती होईल, हा प्रश्न मला पडला… 🔹 तब्बल अठ्ठ्यात्तर कोटी कार्षापण (सुवर्णमुद्रा ) त्या भूमीवर आच्छादून ती भूमी फक्त तथागतांवरील असीम श्रद्धेपोटी अनाथपिंडकाने विकत घेऊन तथागतांना त्याने अर्पण केल्याचे उल्लेख तत्कालीन पालि ग्रंथांमध्येही आढळून येतात.प्रत्येक सुवर्णमुद्रा एक तोळ्याची जरी धरली, तरी त्या हिशेबाने अठ्ठ्यात्तर कोटी तोळे – म्हणजे अठ्ठ्यात्तर हजार किलो वजनाचे, म्हणजेच तब्बल अठ्ठ्यात्तर टन सोने देऊन सुदत्त अनाथपिंडकाने ही आजचे साडेचौदा एकर क्षेत्र असलेली जमीन फक्त आणि फक्त तथागतांवरील असीम श्रद्धेपोटी राजकुमार जेत याचेकडून विकत घेतली.आजच्या बाजारमूल्याने अठ्ठ्यात्तर टन सोन्याची किंमत किती असावी…? सोन्याचा आजचा बाजारभाव ७०,०००/- रुपये प्रतितोळा जरी धरला, तर तो दर ७०,००,०००/-रु.प्रति किलो (सत्तर लाख रुपये प्रति किलो) या हिशेबाने ७८,००० किलो वजन असलेल्या त्या सुवर्णमुद्रांची किंमत तब्बल ५४६,०००,०००,०००/- रुपये ( पाच निखर्व, चार खर्व, सहा अब्ज रुपये) इतकी महाप्रचंड होते….!
सुदत्त अनाथपिंडकाची तथागतांवरील श्रद्धा पाहून, राजकुमार जेत याचेही दातृत्व जागे झाले, आणि आपल्या जमीनीचे मूल्य म्हणून सुदत्त अनाथपिंडकाने दिलेल्या अठ्ठ्यात्तर कोटी सुवर्णमुद्रांपैकी निम्म्या, म्हणजेच एकोणचाळीस कोटी सुवर्णमुद्राच स्विकारुन, उरलेल्या एकोणचाळीस कोटी सुवर्णमुद्रा राजकुमार जेत याने अनाथपिंडकास परत केल्या व त्यांच्या बदल्यात तथागतांना राहण्यासाठी अर्पण करण्यात येणाऱ्या या जागेला आपले स्वतः चे नाव देण्यात यावे, अशी त्याने अनाथपिंडकाकडे इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेचा स्विकार करून अनाथपिंडकाने त्या जागेचे ‘जेतवन’ असे नामकरण केले. तर, तथागतांसाठी त्याने जी कुटी निर्माण केली, ती चंदनाच्या सुवासाने सतत सुगंधित असल्याने, तिलाच ‘गंधकुटी’ असे म्हणण्यात येऊ लागले. प्रस्तुत शिल्पाच्या वर्तुळाकुटी कडेवर वरच्या बाजूस अशोककालिन ‘धम्मलिपी’ मध्ये ‘गंधकुटि’ -‘असे स्पष्ट कोरलेले दिसून येते.तर शिल्पाखाली ‘जेतवन अनाधपिडिको देति कोटिसथतेन केता’ असे वाक्य प्राकृत भाषेत, धम्मलिपीमध्ये कोरलेले आहे. जगातला आतापर्यंतचा सर्वात महागडा व्यवहार – तो देखील दानासाठी होता, आणि ‘अनाथपिंडका’इतका ‘महादानशूर’ देखील आजपर्यंत दुसरा कोणीही झाला नाही…..!असा बुध्दाच्या धम्माचा प्रभाव होता….. !जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुध्दाय!!