अंजनगाव सुर्जी तालुका पांढरी खालापूर येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दार यासाठी मोठा संघर्ष गेल्या 15 ते 20 दिवसापासून चालू आहे या गावावर काही जातिवादांनी बहिष्कार टाकला आहे. अद्यापही येथील संघर्षाला न्याय मिळाला नाही. सर्व अधिकारी या जातीवाद्यांच्या पाठीशी आपल्या समाजाला वाढीत टाकण्याचे काम या जिल्ह्यात चालू आहे. म्हणून न्याय हक्कासाठी..आज पांढरी येथील बौद्ध समाज बांधव संपूर्ण गाव सोडत आहेत.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दार उभारल्यावरुन गावात काही समाजकंटकांनी बौद्ध समाजावर बहिष्कार टाकले आहे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दार संदर्भात सर्व ठराव मंजूर आहेत,तसेच सर्व N.D.C.सुध्दा असुन शासन प्रशासन गप्प आहे.
पांढरी येथील बौद्ध समाज गावं सोडत आहे या गावातील आपल्या समाजाच्या पाठीशी महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांनी खंबीर उभे राहून संघर्ष केला पाहिजे अशी गावकऱ्यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे आणि गावकऱ्यांवर जो बहिष्कार टाकला आहे त्या सर्वजातीवादीय बहिष्कार टाकणार वयावर सरकारने गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी गावकऱ्यांची मागणी आहे अन्यथा त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा गावकऱ्यांनी इशारा दिला आहे आणि याला स्वतः हे प्रशासन जवाबदार राहणार आहेत व गावकऱ्यांनी ग्राम पांढरी (अमरावती) ते मुंबई मंत्र्यांलयावर पैदलवारी करिता महाराष्ट्राच्या सर्व भीमसैनिकांना या लढ्यात शामिल होण्याकरिता आव्हान केले आहे आणि बौद्ध समाजाला न्याय मिळालाचं पाहिजे हे ग्रामवासियांची अपेक्षा आहे अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रभर बौद्ध समाजाकडून आंदोलन,मोर्चा झाल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा बौद्ध समाजाच्या गावकऱ्यांनी प्रशासनाला जाहीर शब्दात इशारा दिला आहे.
मा.हिम्मतराव गवई -अमरावती जिल्हा समन्वयक(प्रकाशपर्व न्युज)संपर्क-9604959940