Homeप्रदेशऔरंगाबाद येथे भव्य श्रामनेर प्रशिक्षण शिबिर!!!

औरंगाबाद येथे भव्य श्रामनेर प्रशिक्षण शिबिर!!!

औरंगाबाद:-
आज दिनांक 19 /7 /2024 रोजी वाळुंज एमआयडीसी परिसरात महाकार्य बुद्धिस्ट मॅनेस्ट्री साजापूर वाळुंज तालुका जिल्हा औरंगाबाद वर्षावास प्रारंभ गुरुपौर्णिमा धम्मप्रवर्तक दिन आषाढी पौर्णिमा अश्विन पौर्णिमा ते 21 जुलै ते 27 सप्टेंबर 2024 रोजी भव्य श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व श्रद्धावान उपासक उपाशीकेंना कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित संपादन करावे असे आव्हान भिकू करुणानंद थोरो संचालक दि ग्रेट हॅप्पीनेस यूट्यूब चैनल यांच्या सौजन्याने भव्य असे श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नियम व अटी (1) शिबिरामध्ये वय वर्ष 20 ते 50 या वयोगटातील उपासक सहभागी होता येईल.(2) शिबिरार्थी हा मानसिक व शारीरिक दृष्ट्या सुदृष्ट असा असावा.(3) शिबिरामध्ये दिलेल्या अनुशासनाचे व अटीचे पालन करणे अनिवार्य राहील. (4) रविवार 21 जुलै 2024 रोजी सकाळी 8: 00 वाजता श्रामनेर दिक्षा देण्यात येईल.(5) शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्यांना भेटता येणार नाही.(6) शिबिरात सहभागी होण्यासाठी सोबत येताना आधार कार्ड झेरॉक्स,वही,पेन, टूथब्रश,पेस्ट,सेविंगचे सामान, चप्पल,आवश्यक औषधे व टाॅवेल सोबत आणावे.(7) येतानी दाढी डोक्याचे मुंडन,हात पायाचे नखे,काढून यावे.कमरेचा करगोटा,हातातील कडे,ताईत,गंडे, डोरे व मोबाईल घरी ठेवून यावे (मोबाईलचा वापर करता येणार नाही)(8) शिबिरात गैरवर्तन केल्यास शिवर काढून घरी पाठवण्यात येईल
श्रद्धावान दान दात्यांसाठी सूचना
(1) तीन महिने चालणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी भिकूसंघ व श्रामणेर संघासाठी नाष्टा,फळे, भोजनदान आवश्यक वस्तुदान करावयाच्या असल्यास श्रद्धावान दानदात्यांनी अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.(2)औरंगाबाद शहर,ग्रामीण व वाळुंज एमआयडीसी परिसरातील सर्व श्रद्धावानांनी भिकू संघाचे भिक्षा टन-भोजनदात्यांच्या तारखासाठी (कपिल सातदिवे 9960679307) या क्रमांकावर संपर्क साधावा (3) रविवारी 21 जुलै 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्य संपादन करावे.(4) सोबत येताना स्वतः हा भिकू संघासाठी भोजन घेऊन यावे.(5) वृक्षारोपणासाठी नारळ,अशोका, निलगिरी,पाम ट्री इत्यादी झाडे आणून लावू शकतात.(6)औरंगाबाद शहरातून औरंगपुरा,मुकुंदवाडी वो बाबा पेट्रोल पंप येथून सिटी बस क्रमांक 9 थेट साजापूर येथे येते.(7) निवासी शिबिर असल्याने आपण दान स्वरूपात तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी इत्यादी साहित्य वो बांधकामाशी संबंधित साहित्य दान करून पुन्हा संपादन करावे असे आव्हान भिकू करुणानंद थोरो यांनी केले आहे.तसेच या शिबिराचे व प्रशिक्षणाचे जास्तीत जास्त उपासक व उपासिका यांनी लाभ घ्यावा.

मा.शाम जाधव,नाशिक जिल्हा प्रतिनिधी,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular