दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला संपले. वंचित बहूजन आघाडीला मतदारांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला…!! अकोला लोकसभा मतदारसंघात विजय आपलाच आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यां कडुन विजयाची हमी दिली जात आहे…!! महाराष्ट्रात वंचित बहूजन आघाडीच्या रुपाने सक्षम तिसरा पर्याय मतदारांनी ऊभा केला आहे…!! पुर्व विदर्भ, प. विदर्भ आणि मराठवाड्यातील दोन मतदारसंघात निवडणूक पार पडली. दोन टप्प्यातील मतदाना वरुन असे लक्षात येते आहे की, आंबेडकरवादी आणि बहूजनवादी तसेच संविधानवादी मतदारांनी सक्षम तिसरा पर्याय म्हणून वंचित बहूजन आघाडीला कौल दिला आहे…!! २०१९ मध्ये वंचित बहूजन आघाडीने बी टीम चा आरोप आणि अनेक अफवा, अडथळ्यांचा सामना करीत ६.९८ टक्के मते घेतली होती. त्यावेळी भित्र्या तथा अति सुरक्षितता शोधणा-या शहरी आणि सुशिक्षित आंबेडकरवादी समुहाने कॉंग्रेस पक्षाच्या पारड्यात मते टाकली होती आणि म्हणून वंचित बहूजन आघाडी ८% मते घेण्यात कमी पडली त्याचा परिणाम असा झाला की, वंचित बहूजन आघाडीला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला नाही…!! घराणेशाही वाले मविआ आणि महायुती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांचे लूटूपुटूचे भांडणं आहे. निवडणुकी नंतर ते एकमेकांना सरकार बनविण्यासाठी मदत करणार आहेत. हे अजित पवार,प्रफुल्ल पटेल आणि एकनाथ शिंदे,तथा देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीतून स्पष्ट होतं आहे. कुणी स्वतः ला जेलमध्ये जाण्यापासून वाचविण्यासाठी पक्ष बदलतो तर कुणी आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी पक्ष बदलतो आहे तर कुणी मंत्री पदासाठी पक्ष बदलतो आहे कारणे काहीही असोत ते सर्व एकाच माळेचे मणी आहेत हे लक्षात घ्या. संविधान वाचविण्याचा किंवा लोकशाही वाचविण्याची भाषा ही शुध्द धुळफेक आहे,ढोंग आहे हे आंबेडकरवादी मतदारांनी लक्षात घ्यावे…!! घराणेशाही वाले आपल्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी राजकारण करतात, मतांचा वापरही त्यासाठीच करतात म्हणून आपणं आंबेडकरवादी समुहाने आपल्या विचाराचा राजकीय पक्ष ऊभा करण्यासाठी आपल्या मतांचा वापर केला पाहिजे…!! अजून पुढच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे.आंबेडकरवादी,बहूजनवादी, संविधानवादी मतदारांनी यापुढील टप्प्यातील मतदान वंचित बहूजन आघाडीला दिले तर वंचित बहूजन आघाडीला प्रादेशिक पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी लागणारे ८% मतदानाची अट सहज पार करता येईल आणि वंचित बहूजन आघाडीला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळेल…!!वंचित बहूजन आघाडीला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळविणे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील राजकीय पक्ष ऊभा करण्यासाठी कटीबद्ध होण्याचा प्रयत्न आहे…!! डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना जळते घर म्हटले त्या कॉंग्रेस पक्षाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील राजकीय पक्ष ऊभाच राहू दिला नाही, रिपब्लिकन पक्षाचे तुकडे कॉंग्रेस पक्षानेच केले, रिपब्लिकन नेत्यांना कॉंग्रेस पक्षात सामावून घेऊन रिपब्लिकन पक्ष क्षीण केला आणि म्हणून भाजप सारखे उजव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष मोठे झाले…!! प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी ८% मतांची अट आहे तथा किमान दोन खासदार निवडून आणणे गरजेचे आहे आणि म्हणून पुढिल टप्प्यातील मतदानात सर्व आंबेडकरवादी मतदारांनी वंचित बहूजन आघाडीला भरभरून मते द्यावीत ही अपेक्षा व्यक्त करतो…!! अतिशय कष्टाने गेल्या ४० वर्षापासून घेतलेल्या मेहनतीवर वंचित बहूजन आघाडी हा पक्ष ऊभा राहिला आहे. घराणेशाही वाले एका एका जागेसाठी भांडतात. आपल्या मुलांची,नातवाची सोय बघतात आणि युतीच्या सबबीखाली वंचित बहूजन आघाडीची ७% मते फुकटात हळपण्याचा कावेबाज पणा करीत होते म्हणून मविआ सोबतं युती झाली नाही…!! मविआ सोबतं युती करून वंचित बहूजन आघाडीला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविता आली नसती.कारणदोन आणि तीन मतदारसंघातील मते ८% मतांची भरपाई करु शकली नसती आणि दिलेल्या तीन जागेवर विजयी झालो नसतोच मग प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता कशी मिळेल.?? गेल्या चाळीस वर्षापासून अतिशय कष्टाने केलेली कमाई कुणी सट्ट्यात घालवतो का.? मविआ सोबतं वंचित बहूजन आघाडीने युती करणे म्हणजे जणूकाही सट्टा लावण्याचा प्रकार झाला असता. एकाही जागेवर निवडून येण्याची हमी नाही, आणि दोन, चार मतदारसंघातील टक्के वारी ८% होणारच नाही मग गेल्या ४०वर्षाची कष्टाची कमाई घराणेशाही वाल्यांच्या मुलांसाठी, नातवांसाठी आणि नातेवाईकांसाठी डावावर लावावी का.?? मविआ सोबतं युती करून वंचित बहूजन आघाडीची फरपट झाली असती. दगलबाज घराणेशाही वाले आंबेडकरवादी मतांवर आपल्या कुटुंबातील मुला, नातवांना राजकारणात सेटल करण्याचा मनसुबा रचतं होते…!! वंचित बहूजन आघाडीच्या रुपाने महाराष्ट्रात सक्षम तिसरा पर्याय ऊभा राहिला आहे. सकारात्मक विचार करून आंबेडकरवादी, बहूजनवादी आणि संविधानवादी मतदारांनी मतदान करावे अशी अपेक्षा आहे…!!
लेखक:-प्रा.भाष्कर भोजने(राज्य सल्लागार-फुले,शाहु,आंबेडकर विद्वत महासभा)