Homeबड़ी खबरेकांदिवली येथील दामूनगर-भीमनगर येथील बंद बसआगारात अनिधिकृत्त वाहनतळाला स्थानिक जनतेचा विरोध

कांदिवली येथील दामूनगर-भीमनगर येथील बंद बसआगारात अनिधिकृत्त वाहनतळाला स्थानिक जनतेचा विरोध

उत्तर मुंबई, (मागेठाणे) येथील कांदिवली क्षेत्रात दामुनगर भिमनगर बस स्थानक क्रमांक २८२ गौतम नगरच्या मागे बस आगार आवारात काही दिवसापासून अनेक खाजगी वाहने त्याठिकाणी उभे राहत आहेत.संबधित जागा ही शासकिय बसस्थानक अंतर्गत मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत असुनसुद्धा त्या ठिकाणी विनाशासकिय परवानगी घेत खाजगी अनिधिक्रुत्त वाहणतळ चालवण्यामागे कोण आहे व यामागचे कारण हे असमाधानी आहे.येथे कोणतेही सुचनाफलक लावले नसल्याने याठिकाणी कोणाची मनमुजोरी चालत आहे असा मोठा प्रश्न त्याठिकाणी निर्माण होत आहे.सदर ठिकाणी बसआगार सुरू होते व अचानक कोणतेही सुचना न देता ते कायम स्वरूपी बंद करण्यात आले ज्यामुळे तेथील स्थानिक जनतेला शासकीय परिवहन सेवेपासुन वंचित ठेवलेले जाते.हे कोणाच्या सांगण्यावरून झाले असा प्रश्न तेथील जनतेला विचलित करत आहे या बसस्थानक आगाराचे जर खाजगीकरण झाले तर मग या ठिकाणी त्याप्रमाणे सुचना फलक लावणे अनिवार्य आहे ते तिथे कुठल्याही परिस्थितीत दिसून येत नाही सदर ठिकाणी हे वाहनतळ कोणाला खाजगी माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे याची परस्पर माहिती शासनाने जनतेला उपलब्ध करुन द्यावे व जर ते खाजगी असेल तर महानगर पालिकेने कायमस्वरूपाने खाजगी वाहनतळ बंदची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी येथील रहीवासी अनिल हिंगुलाल रत्नाजी यांनी केली आहे अन्यथा सदर ठिकाणी उपोषण करावे लागणार अशी माहीती त्यांनी दिली आहे.

निलेश गावंडे, कार्यकारी संपादक, प्रकाशपर्व न्युज,+91-8446648488

RELATED ARTICLES

Most Popular