दि.19 फरवरी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश यशवंत आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्याची अस्मिता असलेल्या वीरमाता जिजाऊ सभागृहाच्या सुशोभीकरण व दुरुस्तीकरण करण्यासाठी निधी संकलन रथयात्रेचे आयोजन केले होते.
गेल्या अनेक वर्षापासून अकोल्यातील विरमाता जिजाऊ सभागृहाकडे दुर्लक्षित केले जात असायचे,सभागृहाची अवस्था ही अतिशय दयनीय व खंडर होती याविषयी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पाऊल घेत आंदोलन केले होते आणि शहरात स्वाक्षरी मोहीम राबवल्याने व अकोला महानगरपालिकेला याद्वारे जाग आणून दिली व याद्वारे निधी संकलन रथ यात्रा काढून सुमारे दिड कोटीचा निधी संकलन करण्यात आले आहे व अखेर वंचित बहुजन आघाडीच्या वतिने वीरमाता जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेत्या प्राध्यापक अंजलीताई प्रकाश आंबेडकर आणि पदाधिकारी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला शहरातील लाखोच्या संख्येने नागरिक देखील हजर होते.
मा.शरद इंगोले
अकोला व बुलठाणा जिल्हा समन्वयक
मो.नं.-9689211382