HomeUncategorizedडॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,रमेदी, वसई वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,रमेदी, वसई वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु

पालघर दि. ०५ जून २०२४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रमेदी वसई येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाटी प्रवेश सुरु असून प्रवेश प्रक्रिया ही पुर्णपणे ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने आहे. सदर प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रमेदी वसई या वसतिगृहामधून विनामुल्य उपलब्ध करण्यात आले आहे.

वसतिगृहात प्रवर्ग निहाय खालील प्रमाणे जागा रिक्त आहेत. अनुसूचित जाती 34, आर्थिकदृष्ट्या मागास व इतर मागास प्रवर्गासाठी 01, विशेष मागासवर्ग – प्रवर्गासाठी 02, दिव्यांग 01, अनाथ-01, शासकीय वसतिगृहाचे सन 2024-25 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणेआहे : इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळुन) विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 31/07/2024 पर्यंत, पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द दि. 05/08/2024, पहिल्या निवड यादी नुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12/08/2024, रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करणे 15/08/2024, दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 22/08/2024 पर्यंत देण्यात येतील.


बी. ए./ बी. कॉम/बी.एस.सी. अभ्यासक्रमामध्ये 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/ पदवी आणि एम.ए./एम.कॉम/एम.एस.सी. अशा पदवी नंतरच्या पदव्युतर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळुन) विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 31/07/2024 पर्यंत, पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिध्द दि. 05/08/2024, पहिल्या निवड यादी नुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12/08/2024, रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करणे 15/08/2024, दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 22/08/2024 पर्यंत देण्यात येतील.


पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहील्यास वरील दिनांकापर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस प्राधान्य देऊन त्यास तात्काळ त्याच दिवशी वसतिगृहा प्रवेश दिला जाईल.


तसेच याबाबत अधिक माहितीसाठी मुकुल विचारे ९५९४६३८३२७ यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर यांनी केले आहे.

मंगेश उईके, पालघर जिल्हा समन्वय, प्रकाशपर्व न्युज चॅनल
RELATED ARTICLES

Most Popular