इगतपुरी दिनांक 12 /7/ 2024 रोजी इगतपुरी तहसीलदार कार्यालय येथे आदिवासी नारी शक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वतीने विविध विषयावर प्रमुख मागण्या (1) रेशन कार्ड ऑनलाइन करणे(2) रेशन कार्ड मिळणे बाबत (3) विधवा महिलांना मुलांच्या पंचवीस वर्षाची अट रद्द करणे यांना 21000 /- उत्पन्न दाखले मिळणे बाबत व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करणे बाबत (4) संजय गांधी निराधार फॉर्म साठी तलाठी कामगाराची सही मिळणे बाबत आधी विषयांवर इगतपुरी तहसीलदार यांना निवेदन देऊन या सर्व आदिवासी नारी शक्ती महिला या सर्व इगतपुरी तालुक्यातील विभागातील महिला सहभागी झाल्या होत्या आदिवासी नारीशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष नीता वारघडे, उपाध्यक्ष शालू हंबीर, सचिव शकुंतला ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मीना सोनवणे, संघटक जया भगत, संघटक मंजुळा सराई, संघटक गजाबाई वाणी इत्यादी कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या. आदिवासी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था इगतपुरी यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसीलदार कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला होता. माननीय इगतपुरी तहसीलदार साहेब यांनी सदरील आदिवासी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व सर्व महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी यांना आश्वासन दिले तुमच्या सर्व विषयावरील विचार करू असे सांगण्यात आले.
प्रतिनिधी,अशोक पगारे,नाशिक