परभणी येथील वडार समाजातील विधीसेवेचा विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याने या घटनेनंतर संपुर्ण महाराष्ट्रात अफरातफरीचं वातावरण निर्माण झाले असून हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद समजले जात आहे.
विषेश म्हणजे परभणी येथील एका अज्ञात व्यक्तीने संविधानाच्या प्रस्ताविकेची विटंबना केली ज्यासंदर्भात निषेध म्हणून सोमनाथ हा उठाव म्हणून आंदोलनकर्त्यांत सहभागी होता असल्याचे स्थानिक नागरीकांकडुन माहीती मिळाली होती व नंतर त्याला अटकही झाली होती अशी माहीती प्राप्त झाली.विधीसेवेचा विद्यार्थी सोमनाथ सुर्यवंशी यांचा जामीन अर्ज मंजुर होऊनही न्यायालयीन कोठडीतचं त्यांचा मृत्यू का झाला असावा, हे गंभीर विचार करण्याची बाब आहे.यामागे कुणाचं शडयंत्र आहे व न्यायालयीन कोठडी असतांनाच का जिव गेला असावा यामागे कुणाचं हात आहे याला कोण जबाबदार आहे “प्रशासन की राजनेता”.
वंचितचे प्रकाश आंबेडकर बोलले की,सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने त्यांचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम अंतर्गत (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातचं केली जावी व त्याचे चित्रीकरण करण्यात यावे.त्यासोबतचं फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली याचे पोस्टमॉडम केले जावे असेही ते यावेळी म्हणाले.
निलेश गावंडे, कार्यकारी संपादक, प्रकाशपर्व न्युज, मो.नं- 8446648488