HomeE-Paperपरभणी येथे भारतीय संविधान उद्देशिकाचे तोडफोड करून विटंबना करण्यात आली, ह्या घटनेचे...

परभणी येथे भारतीय संविधान उद्देशिकाचे तोडफोड करून विटंबना करण्यात आली, ह्या घटनेचे निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभा, पालघर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब पालघर यांना निवेदन देण्यात आले.

पालघर ( प्रतिनिधि ) : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती बसवण्यात आली होती. मंगळवारी दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी एका व्यक्तीने राज्यघटनेच्या प्रतिकृतीला सुरक्षित ठेवण्यासाठी लावण्यात आलेली काच फोडून विटंबना केल्याने शहरात तसेच राज्यात नागरिकांमध्ये प्रचंड चीड आणि तणाव निर्माण झाला आहे.


आरोपींवर कठोर कारवाई करण्या संदर्भामध्ये परभणीतील तरुण तसेच संविधान प्रेमी नागरिक रस्त्यावर उतरून कारवाईची मागणी करत असताना, पोलीस प्रशासनाने थेट बौद्ध वस्त्यांवर जाऊन कोंबिंग ऑपरेशन सुरू केल्याने परभणी शहरात वातावरण चिघळले असून, राज्यात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाले आहे.


देशाच्या राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या समाजकंठकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आम्ही भारतीय बौद्ध महासभा, पालघर जिल्हा शाखेच्या वतीने करीत आहोत.


यावेळी भारतीय बौद्ध महासभा, पालघर जिल्हा शाखेचे अध्यक्ष : आयू. प्रफुल्ल सुपे, सरचिटणीस : आयू . किरण जाधव, कोषाध्यक्ष : आयू. सिद्धेश जाधव, संरक्षण उपाध्यक्ष : आयू . संतोष जाधव, संस्कार सचिव : आयू. विकास जाधव प्रचार पर्यटन सचिव : आयू. अनंत जाधव, संघटक : श्यामराव खरात, बौद्धचार्य. आयू. विकास भोणे, भारतीय बौद्ध महासभा, पालघर जिल्हा ( महिला विभाग ) शाखेचे अध्यक्ष : आयूनि. कृतिकाताई गायकवाड , कोषाध्यक्ष : आयूनि. कल्पनाताई गवई , आयुनि. प्रतीक्षाताई जाधव, आयुनि. सरलाताई तायडे व संविधान प्रेमी भीम अनुयायी कार्यकर्ते उपस्थित होते



आयू. सिद्धेश अरविन्द जाधव. पालघर प्रतिनिधि, प्रकाशपर्व न्यूज चॅनल

RELATED ARTICLES

Most Popular