Homeप्रदेशपरिणाम लक्षात घ्या....!!

परिणाम लक्षात घ्या….!!

महाराष्ट्रातील रिपब्लिकन, रिपब्लिकन म्हणून नेतृत्व करणारे, रामदास आठवले, राजेंद्र गवई, जोगेंद्र कवाडे, खोरिपाचे खोब्रागडे,आंबेडकरवादी म्हणून घेणारे बसपा,बीआर एस पी प्रमुख सुरेश माने, विजय भटकर.या सर्वांना सवर्णांचे राजकीय पक्ष. सवर्णांचा मिडिया, आणि सवर्णांचे राजकीय विश्लेषक यांनी जाणिवपूर्वक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतून अलगद बाद करुन टाकले. त्यांची कुठचं चर्चा नाही.नांव नाही, निशाण नाही…!! अर्थात त्यांचे राजकीय अस्तित्व संपल्यात जमा झाले आहे…!! हा कशाचा परिणाम आहे.?? दादासाहेब गायकवाड आणि दादासाहेब रूपवते यांनी कॉंग्रेस पक्षा सोबतं रिपब्लिकन पक्षाची पहिल्यांदा युती केली आणि तिथूनच रिपब्लिकन राजकारण संपवण्याचं षडयंत्र सुरू झालं त्याचा हा परिणाम आहे…!! सवर्ण मानसिकतेच्या राजकीय पक्षां सोबतं युती आणि आघाडी करुन आपला पक्ष वाढवू या भाबड्या आशेवर रिपब्लिकन नेते राहीले आणि संपले हा अनुभव आहे…!! सवर्णांना सत्तेत कायम रहायचे आहे. ते तुम्हांला सत्ता देणार नाहीत. सत्ता तुम्हाला संघर्ष करुन, आपले अस्तित्व दाखवूनच मिळवावी लागेल…!! वंचितांना सत्तेत बसवायचे असेल तर स्वतः च्या ताकदीवरच सत्ता मिळवावी लागेल…!! इथं सवर्णांचे राजकीय पक्ष आपसात युती करतात, एकमेकांना मतांची देवाणघेवाण करतात परंतु वंचितांशी युती करीत नाहीत. वंचित समुहाला मते सुद्धा देतं नाहीत…!! हा पारंपारीक सत्ता संघर्ष आहे. सवर्ण विरुद्ध वंचित…!! क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती वादी…!! घराणेशाही विरुद्ध लोकशाही…!! सरंजामी वृत्तीचे विरुद्ध फुले आंबेडकरी विचारधारेचे….!! महाराष्ट्रात क्रांतीदर्शी विचारांचे राजकारण करणारे एड. बाळासाहेब आंबेडकर आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर गेले ४० वर्षे राजकारणात टिकून राहिले आहेत.त्यांना कुणीही प्रस्थापित राजकीय पक्ष आणि सरंजामी नेतृत्व संपवू शकले नाही. त्यांना कुणीही सत्तेच्या तुकड्या साठी विकतं घेऊ शकले नाही. त्यांना लोभ,मोह,माया,अशा कुठल्याच जाळ्यात अडकवता आले नाही आणि म्हणून सवर्णांचे नेते, सवर्णांचा मिडिया, सवर्णांचे राजकीय विश्लेषक एड. बाळासाहेब आंबेडकर यांना हटवादी म्हणून बदनाम करतात तर कधी बी टीम म्हणून बदनाम करण्याचा अजेंडा राबवितात…!! हा एकटा वाघ जेरबंद करता येतं नाही म्हणून त्याच्या घरातील माणसं फितूर करुन “आंबेडकरी विचारवंत” म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामाला लावली जातात आणि वंचित समुहाचे राजकारण खच्ची करण्याचा प्रयत्न केला जातो…!! सवर्णांच्या राजकीय पक्षांची वकीली आंबेडकरवादी विचारांच्या विद्वानांनी का आणि कशासाठी करावी.?? त्याचा परिणाम लक्षात घ्यावा. २०२४ ची लोकसभा संपली. मात्र पुढील काळात अशी गंभीर चुक होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे…!!

लेखक:- प्रा.भाष्कर भोजने,(राज्य समन्वयक – फुले, शाहु, आंबेडकर विद्वत महासभा)

RELATED ARTICLES

Most Popular