दि.11एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुलें यांच्या 197 वी जयंतीनिमित्त भारतीय बौध्द महासभा-डहाणू शहर शाखेच्या वतिने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यात डहाणू शहर शाखेच्या काही शहर पदाधिकारी दिपक काकडे,डॉक्टर सुखदेव लाडे,लक्ष्मण गायकवाड,भिकाजी वाघ,रमेश गव्हाणे,भीमराव गाडे,भीमराव चव्हाण,राजेश गायकवाड सुकाळे साहेब व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माननीय बांधणे महात्मा फुले यांच्या बद्दल थोडक्यात सांगितले की कशाप्रकारे त्यानी विषम परिस्थितीमध्ये महिलांची शाळा उघडले आणि महिला व पुरुषांना शिक्षणाचा समांतर दर्जा मिळायला सुरुवात झाली.त्यासोबतच रक्तदान शिबिर आयोजनाचे मुख्य उद्देश म्हणजे आज रक्ताच्या कमीपणामुळे लाखो लोकांचे जीव धोक्यात असतात अशी कमतरता भासू नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर सोहळा आयोजित करण्यात आले होते.यादरम्यान संबंधित पदाधिकारी यांनी महात्मा फुले यांच्या जिवनीवर आधारित स्थानिक जनतेला मार्गदर्शन केले व अशाप्रकारे जयंती सोहळा व रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात व सुलभ पद्धतीने पार पडला.
पालघर तालुका प्रतिनिधी,सुनिल शेलार,(प्रकाशपर्व न्युज)