दिनांक १४/११/२०२४ रोजी मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह सा. अकोला यांचे आदेशाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन खदान हददीत अवैध रक्कमेची वाहतुक, अवैध दारू, अमली पदार्थ, अग्नीशस्त्रे इत्यादी बाळगणा-या इसमावर कारवाई करण्या साठी आदेश असल्याने मा. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन खदान हददीत पेट्रोलिग करीत असतांना गुप्त बातमी व्दार मार्फत गोपनीय माहीती मिळाली की, खडकी भागात एक इसम हा अवैध अग्नीशस्त्र जवळ बाळगुन उभा आहे अशी मिळालेल्या माहीती वरून सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता एक इसम हा सदर ठिकाणी संशयीत उभा दिसला व त्याचे हालचाली हे संशयास्पद वाटल्याने त्यांचे जवळ जावुन त्यास पो.स्टे. चे मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव विजय उर्फ चंदु गजानन माळी वय ३५ वर्षे मु.पो. झाडेगाव ता. शेगाव जि. बुलढाणा असे सागीतले नमुद इसमाची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडती मध्ये देशी बनावटीची पिस्टल दोन ०२ जिवंत काडतुस एक अर्धवट खाली केस कि. अं ३२,५००/-रू ची अवैध रित्या जवळ बाळगुन मिळुन आल्याने त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन खदान अकोला येथे अप क ८८८/२०२४ कलम ३,२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ चे आचार संहिता कालावधी मध्ये पोलीस स्टेशन खदान अकोला हददीत अनेक कारवाई करण्यात आल्या देशी दारू, गावठी दारू, अवैध्य शस्त्र बाळणारे इसमावर ४,२५ प्रमाणे करवाई करण्यात आली अमंली पदार्थ बाळगणा-या इसमावर कारवाई करण्यात आल्या, अवैध अग्नीशस्त्र बाळगण्या-या इसमावर कलम ३,२५ आर्म अॅक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे अशा प्रमाणे निवडणुकी च्या काळात मोठया प्रमाणत प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या आहेत
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सा जि अकोला मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतिश कुलकर्णी सा यांचे मार्गदशनाखाली पोलीस स्टेशन खदान चे मा. पोलीस निरीक्षक मनोज केदारे सा,. प्रो. पोउपनी दिपक पवित्रकार, पोउपनी नरेंद्र पदमने, पोलीस अंमलदार पोहवा विजय चव्हाण, पोहवा नितीन मगर, पोहवा विजय मुलनकर, पोकों रोहीत पवार, पोकॉ विकांत अंभोरे यांनी सदर ची कारवाई केली.
अकोला जिल्हा समन्वयक,शरद इंगोले,प्रकाशपर्व न्युज,9689211382