Homeराजनितिप्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात उद्या साकोली येथे आदिवासी बहुजन अधिकार महासभा होणार…….

प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात उद्या साकोली येथे आदिवासी बहुजन अधिकार महासभा होणार…….

भंडारा (साकोली): उद्या सोमवार दि. ४ मार्च रोजी परमपुज्य भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बहुजन अधिकार महासभा सभा साकोली येथे पटाचे दान एकोडी रोड दुपारी 2 वाजताच्या दरम्यान हे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला ऍड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.आदिवासी व ओबीसी समाजाच्या अधिकारांना बळ देण्यासाठी आदिवासी बहुजन अधिकार महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची आवाहन भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडी,वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

मा.अश्विन डोंगरे
गोंदिया,भंडारा जिल्हा समन्वयक
प्रकाशपर्व न्युज
+91-8698807062

RELATED ARTICLES

Most Popular