Homeमनोरंजनबालपण ...

बालपण …

जेव्हा आपलं बालपण आपल्याला आपल्या समोर दिसतं तेव्हा आपलं मन नकळत flash back मध्ये जातं..तसचं काहीस आज माझ्या बाबतीत सुद्धा झालं..यात दिसणारी गोलुमोलु सौम्या बघितली आणि मला मीच माझ्या लहानपणीची आठवली..

आपण काय करतोय, कशासाठी करतोय, का करतोय, हे प्रश्न तर कधी पडलेच नव्हते..

तेव्हा मोठे मोठे वाटणारे प्रॉब्लेम आता सहज आणि सोप्पे वाटतात..जेव्हाही मी माझ्या बालपणाकडे मागे वळून बघते तेव्हा मला माझ्या बालपणाला घट्ट मिठी मारावी वाटते आणि त्याला सांगावे वाटते की जे जे प्रॉब्लेम खूप मोठे वाटतं होते ते सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवले आहेत..याची खात्री द्यायची आहे..

पुढे जाऊन ती एक स्वतंत्र महिला असेल..जी पूर्वी नेहमी अंतर्मुख असायची ती आता नेहमीच लोकांच्या भोवताली असते…प्रत्येक गोष्ट करण्यासाठी जी घाबरत होती ती आता प्रत्येक गोष्टीचा सामना आत्मविश्वासाने करत आहे..आणि यापुढेही करेल… कोणाला याचा अभिमान वाटो ना वाटो पण तिला स्वतः लाच याचा अभिमान वाटणार आहे..

So बिनधास्त जग..बालपण कधीही परत येणार नाही..स्वार्थाने भरलेल्या या जगात लहान मूलचं काय ते निस्वार्थी प्रेम करू शकतात..बाकी सगळे स्वार्थीच

लहानपण देगा देवा !!मुंगी साखरेचा रवा !!

लेखक – निकिता चव्हाण-पोळ

RELATED ARTICLES

Most Popular