पुणे (देहूरोड):- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 रोजी देहूरोड येथे भगवान बुद्धाची उघड्या डोळ्याची मुर्तीची प्रतिस्थापना करून बौद्ध भारताच्या पुनर्निर्माणाचा पाया घातला व प्रेरणा देणारी धम्म भूमी बनवली,भारताबरोबरचं जगानेही नतमस्तक व्हावे अशी ही देहूरोडची धम्मभुमी असुन मानवी जगाच्या कल्याणाची प्रेरणा व क्रांतीची देहूरोड धम्मभुमी आहे असे गौरवपुर्ण प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख व भारतीय बौद्धधम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष-प्रबुद्ध साठे यांनी केले.
प्रबुद्ध साठे हे देहूरोड धम्मभुमी च्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम व बौद्ध धम्मदिक्षा समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते,या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष देहूरोड धम्मभुमीचे विकास प्रणेते भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड,यावेळी झालेल्या बौद्धधम्म दीक्षा समारंभात अनेक बहुजन बांधवांनी बौद्धधम्माची दिक्षा घेतली विशेष म्हणजे मातंग समाजाबरोबरच वादीराज पाटील या ब्राह्मण व्यक्तीने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले,प्रबुद्ध साठे नवदिक्षीतांचे बौद्ध धम्मात सहर्ष स्वागत करीत त्यांना मंगलमय शुभेच्छा देताना पुढे म्हणाले,हे धर्मांतर नसून धम्मक्रांती आहे,आपण या ऐतिहासिक ठिकाणी बौद्धधम्माची दीक्षा घेऊन घरवापसी केली असून बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाने तुमचे सुखी, आनंदी,शांती,परिवर्तनशील जीवन होईल,या देहूरोड धम्म भूमीत मराठा ओबीसी माळी,धनगर, आदिवासी,मातंग चर्मकार होलार रामोशी इत्यादी बहुजनांनी येवून बौद्धधम्माची दीक्षा घेऊन आपल्या स्वगृही परत यावे, या भूमीचे विकास प्रणेते आदरणीय भीम पुत्र टेक्सास दादा गायकवाड नेहमी आपल्या स्वागतासाठी तयार असतील असेही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले.
अध्यक्ष भीम पुत्र टेक्सास दादा गायकवाड यांनीही नवदिक्षीतांचे स्वागत केले व संविधान जनजागर परिषद मध्ये बोलताना, या देशाचे नाव भारत आहे,जो हिंदुस्तान म्हणेल त्यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, तसेच हिंदुस्थान म्हणणार्या राजकीय पक्षाची मान्यता काढून घेण्यात यावी,असा इशारा व मागणी टेक्सास दादा यांनी केली,यावेळी, राहुल खांडेकर,संघपाल शिरसाठ, विकास सुर्यवंशी साहेब,सयाजीराव गायकवाड,सुरेश त्रिभुवन गुरूजी, लक्ष्मण साळवे,प्राचार्य सुनील वाकेकर,अशोक गायकवाड, अंबादास शिंदे,भीम शाहीर सीमाताई पाटील,जाॉली मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांनीही ऐनवेळी उपस्थित होते,विनोद चौधरी,गजेंद्र चौधरी,संजय कांबळे, चंद्रकला सोनकांबळे,साधना मस्के, कलावती मस्के,याबरोबरच याबरोबरच ओमप्रकाश चितळे, मिना चितळे,भूषण चितळे,पार्थ चितळे या मातंग कुटुंबाबरोबर वादीराज पाटील या ब्राह्मणाने बौद्ध धम्माची दिक्षा घेतली,सूत्रसंचालन दिपक मस्के व डॉ.किर्तीपाल गायकवाड यांनी केले.यमराज इंगळे यांनी आभार मानले,कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन,देहूरोड बुध्द विहार कृती समिती,अष्टप्रधान मंडळ,धम्मभूमी सुरक्षा समिती, धम्म भूमी एज्युकेशन सोसायटी, धम्मभूमी महिला महासंघ,जेष्ठ उपासक संघ यांनी केले.
मा.निलेश गावंडे, कार्यकारी संपादक (प्रकाशपर्व न्युज)