Homeबड़ी खबरेभागवत बनसोडे यांना लक्ष्मीबाई इंगोले काव्य पुरस्कार जाहीर

भागवत बनसोडे यांना लक्ष्मीबाई इंगोले काव्य पुरस्कार जाहीर

(मुंबई),प्रतिनिधीमुंबई येथे दरवर्षी दिला जाणारा ‘लक्ष्मीबाई इंगोले काव्य पुरस्कार’ यावर्षी सुप्रसिध्द आंबेडकरवादी कवी-गझलकार भागवत बनसोडे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्यस्तरीय असून सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या कवीला प्रदान करण्यात येतो. रू. ५०००/- (पाच हजार रूपये मात्र) शाल, गुच्छ आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्काराचे हे अकरावे वर्ष असून भागवत बनसोडे यांना साहित्य आणि काव्यक्षेत्रात अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत.

यापुर्वीही त्यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे आत्तापर्यंत दळा कांडा, झुंजार, गझल सोहळा ई. काव्य- गझल संग्रह प्रसिद्ध आहेत. श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांच्या समकालीन गझलकारांच्या पंगतीत त्यांचे नाव असून सामाजिक बांधीलकीचे गझलकार म्हणून ते महाराष्ट्रात परिचित आहेत.

काव्य पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी कल्याण येथे आयोजित करण्यात आला असून आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, १ला माळा, कल्याण (प.), जि. ठाणे येथे लक्ष्मीबाई इंगोले काव्य पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई इंगोले वात्सल्य फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा इंगोले असणार आहेत. या प्रसंगी सर्वसंबंधितांनी उपस्थित रहावे अशी विनंती ॲड.नाना अहिरे,सुधाकर सरवदे, प्रा.उत्तम भगत,त्रिभुवन गुरूजी,शाम बैसाणे,भटू जगदेव यांनी केली आहे.

मुंबई प्रतिनिधी,अनिल भगत,प्रकाशपर्व न्युज

RELATED ARTICLES

Most Popular