Homeप्रदेशयुतीचा इतिहास….!!

युतीचा इतिहास….!!

परिस्थिती अशी होती की, १९९२ ला बाबरी मशिद शहीद झाली होती आणि देशात भगवी लाट उसळली होती.त्या भगव्या लाटेत कॉंग्रेस पक्षाचं पानिपत झालं होतं…!!

१९९५ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत कॉंग्रेस पराभूत होऊन युतीचं म्हणजे शिवसेना भाजपचे सरकार सत्तारूढ झाले होते.शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले होते….!!
१९९६ ला लोकसभा निवडणुक झाली ४८ पैकी कॉंग्रेस पक्षाला केवळ १६ जागा मिळाल्या. कॉंग्रेस पक्षाला घरघर लागली होती…!!
पुन्हा दोन वर्षात १९९८ साली लोकसभा निवडणुका लागल्या त्यावेळी घरघर लागलेल्या कॉंग्रेस पक्षाला पुन्हा ऊभारी घेण्यासाठी युती करण्याशिवाय पर्याय नव्हता…!!
१९९८ साली कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षासोबतं युती केली, युतीचा परिणाम असा झाला की, कॉंग्रेस पक्षाचे १६ खासदारचे ३३ खासदार झाले १७ खासदार वाढले…!!
रिपब्लिकन मतांच्या भरवशावर कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आपल्या ताकदीपेक्षा १७ खासदार जास्तीचे निवडून आले…!!
महाराष्ट्रात १७ खासदार कॉंग्रेस पक्षाचे आणि ४ खासदार रिपब्लिकन पक्षाचे निवडून आणण्याची ताकद आंबेडकरवादी मतदारात आहे हा १९९८ चा कॉंग्रेस रिपब्लिकन युतीचा इतिहास सांगतोय…!!
आंबेडकरवादी समूहामध्ये फुट पाडून, गटतट निर्माण करुन,आणि लालची प्रवृत्तीला आमिषे दाखवून कॉंग्रेस पक्ष सातत्याने ही मते फुकटात लाटतं आले आहेत…!!
आणि म्हणूनच महाराष्ट्रातील आंबेडकरवादी मते फुकटात लाटण्याची कॉंग्रेस पक्षाला सवय जडली आहे…!!
मात्र गेली ४० वर्षे कठोर परिश्रम घेऊन ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकरी समुहात स्वाभिमानी बाणा निर्माण केला आता आंबेडकरी समुह एकजुटीने मतदान करतोय हे २०१९ च्या निवडणुकीत सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना दाखवून दिले आहे….!!
आता २०२४ मध्ये मविआ ला वंचित बहुजन आघाडी सोबतं युती करायची आहे मात्र वंचितांचा सत्तेतील वाटा वंचितांना द्यायचा नाही, ही वृत्ती थांबली पाहिजे…!!
महाराष्ट्रात १७ खासदार कॉंग्रेस पक्षाचे आणि ४ खासदार स्वतः चे निवडून आणण्याची ताकद असलेल्या आंबेडकरवादी वंचित बहुजन आघाडी ला कमजोर समजण्याचा, कमी लेखण्याचा आणि देऊ तेवढे घ्या या भिकारचोट वृत्तीने वागण्याचे मविआ मधील नेतृत्वाने थांबवले पाहिजे…!!
मते फुकटात मिळणार नाहीत हे समजून घ्या, नाहीतर तुम्ही संपलेले आहात हेही लक्षात घ्या…!!
जयभीम.

लेखक:-
प्रा.भाष्कर भोजने
(फुले शाहू आंबेडकर विद्वत महासभा – महा.राज्य मार्गदर्शक)
मो.नं.9960241375

RELATED ARTICLES

Most Popular