गुरुवार, दिनांक: २५/०४/२०२४ पालघर : सध्या संपूर्ण भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय संविधनुसार १८ वर्षावरील प्रत्तेक नागरिकाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो आणि तो अधिकार बजावलाच पाहिजे. लोकशाही बळकट करण्यासाठी आपले अमूल्य मत दिलेच पाहिजे. त्यासाठी केंद्र शासन किव्हा राज्य शासन जनतेमध्ये मतदान विषयी अधिक जागरूकता व्हावी यासाठी अनेक उपाय योजना देशभरामद्धे राबवित असते.
सोमवार,दिनांक:२०/०५/२०२४ रोजी पालघर लोकसभेच मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय. श्री. गोविंद मारुती बोडके साहेब यांनी पालघर जिल्ह्यातील जनतेमध्ये मतदान विषयी अधिक जागरूकता व्हावी यासाठी रविवार, दिनांक: ०५/०५/२०२४ रोजी सकाळी : ०५.०० ते ०९.०० वाजेपर्यंत पालघर मधील हुतात्मा चौक येथे “पालघर रन्स फॉर व्होट १० हजार रन २०२४ ” ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १० किमी धावणे पुरुष व महिला १६ वर्षाखालील वयोगट, १७ ते ४५ वर्षे वयोगट, ४५ वर्षांवरील वयोगट असे स्वरूप असून शर्यत पूर्ण केल्यावर प्रत्येक सहभागीसाठी अद्वितीय फिनिशर पदक, प्रत्येक धावपटूला उत्तम डिझाइन केलेले टी-शर्ट मोफत मिळेल तसेच स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक चषक, द्वितीय पारितोषिक चषक, तृतीय पारितोषिक चषक मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस समारंभ होणार आहे. संदर्भात कार्यक्रमाची घोषणा करताना पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय. श्री. गोविंद मारुती बोडके साहेब यांनी माहिती दिली.
भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश असल्याने भारतातील प्रत्येक नागरिकावर मोठी जबाबदारी आहे. तथापि, आम्ही सर्वात कमी मतदान असलेल्या राष्ट्रांमध्ये देखील आहोत. या रनिंग इव्हेंटद्वारे प्रथमच मतदार, मध्यमवयीन कार्यरत व्यावसायिक आणि त्याच इव्हेंटमध्ये उत्साही वृद्धांमध्ये महत्त्व आणि जागरूकता निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. एकूण ब्रँडिंग सुमारे २००० सहभागींसह १०,००० हून अधिक लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे मतदान आणि निवडणुकांबद्दल नक्कीच चर्चा होईल.
या रनिंग इव्हेंटची सुरुवात सर्व सहभागींनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेऊन होईल. आणि हे सर्वज्ञात सत्य आहे की जेव्हा लोक तसे करण्याचे वचन देतात तेव्हा कृती करण्यास अधिक वचनबद्ध असतात. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निश्चितच मोठ्या प्रमाणात मतदान होईल.
आमचा आणखी एक उद्देश सर्व लोकांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीचा प्रचार करणे आहे. या रनिंग इव्हेंटद्वारे आम्ही तरुण आणि वृद्धांमध्ये आरोग्य आणि फिटनेसला प्रोत्साहन देऊ.
पालघर जिल्हा समन्वय, सिद्धेश जाधव, प्रकाशपर्व न्यूज