Homeप्रदेशलोकशाही वाचविण्यासाठी भानावर या….!!

लोकशाही वाचविण्यासाठी भानावर या….!!

लोकशाही वाचवायची आहे, संविधान वाचवायचे आहे. असा कंठशोष करणा-या मविआ ला लोकशाही वाचविण्यासाठी भानावर या असे म्हणायची वेळ आली आहे….!! मविआ मधील तीन्ही घटक पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शप) गट आणि शिवसेना (ऊबाठा) गट सासू सुने सारखे भांडू लागले आहेत त्या भांडणाचा तपशील टि. वी. वाले रोज सकाळ संध्याकाळ महाराष्ट्रातील जनते पर्यंत पोहचवित आहेत….!! घरातील भांडणं जेव्हा चारचौघात जाते तेव्हा त्याला तमाशाचे स्वरूप येते, मविआ मधील एका एका जागेसाठी चाललेलं भांडणं आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या महाराष्ट्रातील जनता टि. वी. वरुन बघतेय त्यामुळे तुमच्या हेतू बद्दल संविधानवादी जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे…!! भाजपच्या हुकुमशहा ला पराभूत करण्याची भाषा करणारे शिवसेनेचे संजय राऊत, तुम्ही एका सांगलीच्या जागेसाठी कॉंग्रेस पक्षाला ४८ जागेवर इंगा दाखविण्याची भाषा करता, नौटंकी बंद करा म्हणता तेव्हा तुमच्या हेतूवर संशय निर्माण होतो….!! एका झटक्यात हुकूमशहाने १३ खासदार पळविले ते सहन झाले, आता एकही जागा मित्र पक्षाला सोडतं नाही त्यामुळे तुमच्या नियतीवर शंका उपस्थित होतं आहे…!! २०१९ मध्ये ४८ पैकी केवळ एका जागेवर विजयी झालेला कॉंग्रेस पक्ष एका एका जागेसाठी भांडतोय, तडजोड करायला तयार नाही ही बुडत्याचे पाय खोलात असे लक्षण आहे. संविधान वाचवायचे म्हणता, हुकूमशहा सोडून मित्र पक्षांशी भांडता. इतर समविचारी पक्षांना सोबतं घेत नाही हे कशाचे लक्षणं आहे.?? शरद पवार साहेब तुमचं संपूर्ण आयुष्य सत्ता उपभोगण्यात गेलं, आता स्वतः च्या घरातचं फुट पडली. अदृश्य शक्ति तुम्हाला धडा शिकवण्याची जय्यत तयारी करीत असतांना तुम्ही एका एका जागेसाठी मित्र पक्षांसोबतं भांडता,समविचारी पक्षांना ( राजू शेट्टींची शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड,वंचित बहूजन आघाडी) सोबतं घेत नाही, हे अवलक्षण कशासाठी.? लोकशाही साठी की, घराणेशाही साठी.?? मविआ मधील तिन्ही घटक पक्षांना ऊद्देशून महाराष्ट्रातील संविधान वादी जनतेच्या मनातील भावना अशा आहेत की, तुम्हाला संविधान वाचवायचे असेल, लोकशाही वाचवायची असेल तर भानावर या, तुमची लढाई हुकूमशहा सोबतं आहे, मित्र पक्षांसोबतं नाही, समविचारी पक्षां सोबतं नाही, तडजोड शिका. अन्यथा लोकशाही वाचवायची आहे ही भाषा बोलू नका, महाराष्ट्रातील जनतेला फसवू नका….!! वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचे धोरण स्पष्ट आहे, राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपातील मुंबईच्या सभेत बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले, साथ हो या अलग हो लेकिन हुकुमशाही के खिलाफ लढेंगे…!! हुकूमशाहीच्या विरोधी लढ्यात भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला सात जागेवर बिनशर्त पाठिंबा देण्याचा बाळासाहेब आंबेडकर यांनी निर्णय घोषित केला आणि त्यापैकी दोन जागेवर पाठिंबा दिला सुद्धा….!! वंचित बहूजन आघाडीची अर्थात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची लाईन क्लीअर आहे, कॉंग्रेस उमेदवाराला पाठिंबा म्हणजे भाजप पराभूत…!! कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा म्हणजे भाजप पराभूत…!! नागपूर मध्ये विकास ठाकरे यांना पाठिंबा म्हणजे भाजप पराभूत…!! बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा म्हणजे भाजप पराभूत…!! सांगली मध्ये प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा म्हणजे भाजप पराभूत…!! भाजपला पराभूत करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी एक पाऊल पुढे टाकून, काही जागांवर पाठिंबा देत मविआ ला साद घातली आहे. मविआ मधील घटक पक्षांनो भानावर या, समविचारी पक्षांना सोबतं घ्या,तडजोड करा,समजंस भुमिका घ्या. काळ आणिबाणीचा आहे याची जाणीव ठेवा,आणि हुकूमशहा ला पराभूत करीत, लोकशाही वाचवा…!! वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी मविआ मधील घटक पक्षांना भाजप सोबतं जाणार नाही हे लेखी मागण्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता….!! कॉंग्रेस पक्षातील, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोजच भाजपमध्ये जात आहेत.आजही ऊड्या मारणे थांबले नाही.राष्टवादीचे एकनाथ खडसे भाजपमध्ये जात आहेत.महाराष्ट्रातील जनता हा भातकुलीचा खेळ उघड्या डोळ्यांनी बघतेय, कोण कधी पलटी मारेलं याचा नेम राहीला नाही…!!अशा अवस्थेत सेक्युलर, संविधानवादी, अल्पसंख्याक मतदारांनी तुम्हाला मते कशी द्यावीत.? लेखी द्यायला कबूल झाले असते तर महाराष्ट्रातील मतदारांनी विश्वासाने तुम्हाला मते दिली असती, अजुनही वेळ गेली नाही, भानावर या आणि हुकूमशहा ला पराभूत करण्यासाठी कृतीशील व्हा…!! मविआ मधील घटक पक्षांकडे किमान समान कार्यक्रम नाही, मतदारांनी तुम्हाला मते द्यावीत कशाच्या भरवशावर.? अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे मविआ मधील घटक पक्षांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचा परिचय करून दिला आहे, हुकूमशहा शी लढण्याचे सोडून दिले आणि वंचित बहूजन आघाडीला टार्गेट करण्यासाठी पडीक पत्रकार, पडीक अर्थतज्ञ, बोलघेवडे संपादक कामाला लावले आणि संविधान वाचवायचे आहे, लोकशाही वाचवायची आहे अशी भुल देणारी मालिका सुरू केली आहे…!! गेल्या ४० वर्षापासून राजकारण करणारे आंबेडकर कधीतरी संविधान विरोधी कृत्य करतांना दिसले काय.? मग आजच त्यांच्या बद्दल संशय निर्माण होईल अशी भाषा वापरणारे घरभेदी कामाला लावणे ही अतिशय विसंगत आणि विकृत चालं आहे मविआ मधील घटक पक्षांनो भानावर या, तुम्हाला संविधान वाचवायचे आहे. घाणेरडे राजकारण करु नका, हुकुमशहा ला मोकाट सोडून देऊन संविधानवादी वंचित बहूजन आघाडीला टार्गेट करने हा रडीचा डाव खेळू नका. भानावर या…!! . दोन महिन्यापुर्वी तोंड भरुन कौतुक करतांना शिवसेनेचे संजय राऊत म्हणायचे प्रकाश आंबेडकर या देशातील ब्रॅण्ड आहेत…!! संजय राऊत निवडणुका लागल्या आणि तुम्ही बेभान झाले, तुम्हाला लोकशाही वाचवायची आहे आणि हुकूमशहा ला पराभूत करायचे आहे आंबेडकर या देशातील ब्रॅण्ड आहेतच. त्यांची मदत घ्या.आणि लोकशाही वाचवण्यासाठी भानावर या…!! निखिल वागळे सप्टेंबर २०२३ ला म्हणत होते प्रकाश आंबेडकर हे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर इंडिया आघाडी साठी फायदेशीर ठरू शकतात.त्यांना मानणारा मोठा वर्ग देशपातळीवर आहे….!! बाळासाहेब आंबेडकर यांचे तोंड भरून कौतुक करणा-या निखिल वागळे यांची निवडणूक लागली आणि भाषा बदलली, ते बेभान होऊन हुकुमशहा ला सोडून देऊन वंचित बहूजन आघाडीला टार्गेट करीत सुटले,निखिल वागळे,बेताल बोलणे सोडा,लोकशाही वाचविण्यासाठी भानावर या…!! एका बाजूला भाजप आरएसएस आहे नियोजनबद्ध निवडणुकीला सामोरे जातोय, आणि दुस-या बाजूला मविआ लोकशाही वाचवायची आहे म्हणतं म्हणतं घराणेशाही साठी बेभान होऊन आपसात लढतं आहे, एकमेकांचे कपडे फाडतं आहेत, समविचारी पक्षांना टार्गेट करीत आहेत हे अवलक्षण आहे…!! लोकशाही वाचवायची असेल तर जे स्वतः ला आंबेडकरवादी म्हणतात त्या सर्व विद्वानांनी (?) लक्षात घ्यावे की, आपला प्रथम शत्रू कोण.? प्रथम शत्रू भाजप आहे तर भाजपलाच टार्गेट करा, प्रथम शत्रू हुकूमशहा आहे तर हुकुमशहालाच टार्गेट करा.इतरांना टार्गेट करणे म्हणजे भाजप ला मदत करणे होय…!! आंबेडकरवादी म्हणवून घेतं आंबेडकरांना टार्गेट करने ही विकृती थांबवा, भानावर या…!! वंचित बहूजन आघाडीने भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वात अगोदर एक पाऊल पुढे टाकले आहे आणि लोकशाही वाचविण्यासाठी सर्व संविधानवादी राजकीय पक्षांकडून प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे…!!

लेखक:-प्रा.भाष्कर भोजने(फुले,शाहु,आंबेडकर विद्वत महासभा राज्य सल्लागार)मो.नं-9960241375

RELATED ARTICLES

Most Popular