Homeप्रदेशवंचितांनो हा सत्तासंघर्ष आहे...!!

वंचितांनो हा सत्तासंघर्ष आहे…!!

तुम्ही सत्तावंचित का आहात.? इथल्या प्रस्थापित वर्गाने सत्ता सतत आपल्या हातात रहावी म्हणून सातत्यपूर्ण रीतीने,वेगवेगळे फंडे वापरुन प्रयत्न केले आणि तुम्हाला सत्तेपासुन वंचित ठेवले आहे…!! अॅड बाळासाहेब आंबेडकर हे गेल्या ४०वर्षापासुन वंचित समुहाचा सत्तेतील वाटा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत….!! आपल्या कडे संसाधनाची कमतरता आहे हे हेरुन त्यांनी अकोला जिल्हा एक मॉडल म्हणून प्रयोग केला आणि अकोला जिल्ह्यातील सत्तावंचित समुहाच्या हातात सत्तेची सर्व सुत्र दिली,प्रस्थापित राजकीय पक्ष आणि प्रस्थापित घराणे यांना सत्तेबाहेर बसविले त्याला अकोला पॅटर्न या नावाने ओळखले जाते…!! अॅड बाळासाहेब आंबेडकर म्हणतात ” सत्ता हवेतून मिळतं नाही, सत्तेसाठी सामाजिक मशागत करावी लागते”…!! बाळासाहेब आंबेडकर गेले ४० वर्षे सामाजिक मशागत करीत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४५ लाख मतदान घेऊन महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष दखलपात्र ठरला आहे. आणि सर्वच प्रस्थापित पक्षाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे…!! २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी शिवाय भाजपला पराभूत करणे विरोधकांना शक्य नाही हे वास्तव सगळ्यांना पटले आहे आणि म्हणून भाजप विरोधी आघाडी अर्थात मविआ मधील तीन्ही पक्षांच्या नेत्यांना आपल्या सोबतं वंचित बहुजन आघाडी असावी असे मनोमन वाटतेय परंतु वंचित समुहाची मते हवी आहेत, वंचितांना सत्तेतील वाटा देण्याची त्यांची तयारी नाही…!! सत्ता आपल्या घराण्यातचं रहावी म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आटोकाट प्रयत्न करीत आहे, तर दुसऱ्या बाजूने वंचित समुहाला त्यांचा सत्तेतील योग्य वाटा मिळावा म्हणून अॅड बाळासाहेब आंबेडकर हे आग्रही आहेत. एका बाजूने घराणेशाही शाबूत ठेवण्याचा आटापिटा तर दुसऱ्या बाजूने वंचितांचा वाटा मिळविण्याची धडपड असा हा सत्ता संघर्ष आहे…!! वंचित समुहाला सत्तेतील वाटा देतं नाही असे सरळ न बोलता मविआ मधील घटक पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना संविधान वाचविण्यासाठी, लोकशाही शाबूत ठेवण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी अवाजवी मागण्या करुन हेकेखोर पणा करु नये अशी आपल्या मर्जीतील मिडिया मार्फत हूल उडवून देतं आहेत…!! मविआ ही आघाडी सत्तेसाठी अस्तित्वात आलेली आहे, विचारांनी जुळलेले राजकीय पक्ष एकत्र आलेले नाहीत,अगदी विरोधी विचारधारेचे तीन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत, शिवसेना हिंदुत्ववादी विचारांची, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीचा गळा घोटणा-या घराणेशाही, सत्तालोलूप वृत्तीचे पक्ष हे कोणत्या अर्थाने संविधानवादी ठरतात परंतु ते आता संविधान बचाव, लोकशाही बचाव या गोंडस स्लोगन चा आश्रय घेऊन सत्तेत कायम राहण्याची धडपड करीत आहेत…!! महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी हाच भाजपला वैचारिक भूमिका घेऊन विरोध करणारा एकमेव पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडी जवळ हक्काचा मतदार सुद्धा आहे…!! तरीही वंचित समुहाला सत्तेतील वाटा मिळतं नसेल तर मविआ अन्यायी भूमिकेतून वागतं आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी मविआ मधील सर्व घटक पक्षातील उमेदवारांची बेरीज ओबीसी समूहासाठी १५ आणि अल्पसंख्याक मुस्लिम समुदायासाठी ३ असावी हा न्यायोचित प्रस्ताव दिला आहे…!! ओबीसी आणि मुस्लिम समुहाला जागा दिल्या तर आपली घराणेशाही लंगडी होते हे कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पचनी पडतं नाही ही खरी मेख आहे…!! घराणेशाही लंगडी करणे म्हणजेच लोकशाही वाचविणे होय. अॅड बाळासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्यासाठी आग्रही आहेत याला तुम्ही हेकेखोर पणा कसा म्हणू शकता.?? परंतु मविआ मधील घटक पक्ष आपला अन्यायी अजेंडा राबविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत… !! आपल्या पोळीवर तुप लाटण्याची सवय जडलेल्या घराणेशाही वाल्या प्रस्थापित पक्षांना हा ओबीसी आणि मुस्लिम समुहाचा वाटा मंजूर नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ला बदनाम करण्यासाठी विकाऊ पत्रकार, लेखक, विचारवंत, आणि मिडियातील लोकांमार्फत अवाजवी मागणी, हेकेखोर पणा अशी बिरुदावली लावून वंचित समुहाचा हक्क नाकारण्याचा खेळ चालू केला आहे….!! मविआ स्वबळावर भाजपला पराभूत करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, त्याची कल्पना मविआ च्या सगळ्या नेत्यांना आहे…!! मविआ मधील तीन्ही घटक पक्ष अजूनही सुरक्षित नाहीत, कोण कोणत्या दिवशी भाजपची वाट चोखाळेल याचा नेम नाही तरीही मविआ वंचित बहुजन आघाडी ला सापत्न वागणूक देत असेल तर सहन किती करावे हा प्रश्न ऊभा राहतोच…!! वंचित समुहाच्या सत्तासंघर्षाचा हा निर्णायक टप्पा आहे, इथे चिवटपणे लढून रणनीति आखून वैचारिक पातळीवर, कुरघोडी च्या राजकारणाला पराभूत करून, सत्तेचे वाटेकरी व्हायचे आहे…!! ही सुवर्ण संधी चालून आली आहे, अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखा त्यागी आणि समर्पण वृत्तीचा बहुजन हितैषी नेता बहूजन समुहाला मिळाला आहे. सर्व विरोधी नेतृत्वाला नामोहरम करण्याची बौद्धिक क्षमता असलेलं नेतृत्व वंचित समुहाकडे आहे…!! शिवसेना संपवण्याचा विडा भाजपने उचलला आहे, शिवसेना आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडते आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची घराणेशाही जनतेला मान्य नाही म्हणून या तिन्ही पक्षांना वंचित बहुजन आघाडी ची आणि वंचित समुहाच्या मतांची नितांत गरज आहे…!! वंचितांनो थोडा संयम बाळगा,अॅड.बाळासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सत्तेच्या दालणात घेऊन जाणार आहेत…!! गोदी मिडिया, भाडोत्री पत्रकार, दलाल वृत्तीचे लेखक, सोशल मीडियावरील हरिजन वृत्तीचे ढोंगी आंबेडकरवादी यांच्या भूलथापा किंवा टिकेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही…!! हा सत्तासंघर्ष आहे, सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवणारे सत्तापिपासू प्रस्थापित सहजच वंचितांना सत्तेतील वाटा देणार नाहीत, म्हणून ही कुरघोडी, करण्याची रणनीति आहे आणि आपलं नेतृत्व सर्वांना पुरुन ऊरणारं आहे त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही…!! ” जिंकत आलेली लढाई हरायची नाही”.

लेखक:-प्रा.भाष्कर भोजने(राज्य सल्लागार-फुले,शाहु,आंबेडकर विद्वत महासभा)मो.नं.9960241375

RELATED ARTICLES

Most Popular