दि.15 मार्च (सडक अर्जुनी तालुका)
संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या निर्देशानुसार देशात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला समर्थन देऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देवून शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यात आला सदर निवेदन मा.तहसीलदार सडक/अर्जुनी यांच्या मार्फत माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांना पक्षाच्या वतीने खालील मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले,
(१) शेतकर्यांच्या शेत मालाला आधारभूत मूल्य मिळालेच पाहिजे.
(२) संपूर्ण देशात फक्त ६% शेतकर्यांना आधारभूत किंमत प्राप्त होते हे दयनीय स्थिती आहे ही तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात यावे.
(३) केंद्र सरकारने पारित केलेल्या नियमानुसार बाजार समिती च्या बाहेर शेतमाल विकण्याची मुभा दिली आहे परंतु शेतमाला ची मूलभूत किंमत सरकार ने निश्चित केली नाही ही शेतकर्यांवर आलेला अन्याय आहे, असे नियम तात्काळ रद्द करण्यात यावे.
(४) या व्यवस्थेमुळे अनेक कंपन्या निर्माण होऊन उत्पादित मालाला योग्य भाव मिळणार नाही व शेतकर्यांचा शोषण केला जाईल अशी व्यवस्था समाप्त करण्यात यावी.
(५) देशात अन्न सुरक्षा नीती नितीकीरीण्यावित केल्यामुळे बाजार समितीचे अस्तित्व संपेल त्यामुळे ही नीती रद्द करण्यात यावी.
(६) सरकारद्वारे सुरू या व्यवस्थे मुळे शेतकर्याला न्याय मिळणे कठीण होईल व प्रशासकीय अधिकारी शासनाच्या बाजूने निर्णय घेतील जे नैसर्गिक न्याय व्यवस्थेचा विरोध आहे.
(७) शेती, बाजार व्यवस्था ,राज्य अंतर्गत विषय आहेत व केंद्र शासनाद्वारे निर्मित तिन्ही कायदे राज्याच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण करतात अशी व्यवस्था बदलविण्यात यावी.
वरील प्रमुख मागण्यांच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीने तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे तीव्र निदर्शन करून निवेदन सादर केले निवेदन देतांना यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुखदास मेश्राम ,उपाध्यक्ष हंसराज राऊत, महा सचिव राजू मेश्राम, संघटक बाबुलाल ईलमकर,सामाजिक कार्यकर्ते दिनेश पंचभाई,संघटक ताराचंद बनसोड,संघटक राजू फुले, प्रसिद्धी प्रमुख आदर्श रामटेके, ग्रा.प.सदस्य हरेश टेंभुर्णे,अनिल टेंभुर्णे,भाऊदास जांभुळकर,महिला आघाडी देवांगणा फुले, जयाताई सुखदेवे,हर्षीला नंदागवळी हे उपस्थित होते.