दि.19 फेब्रुवारी 2024 गोंदिया जिल्ह्यातील समस्त तालुक्यात तसेच गोंदिया येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या अनुषंगाने शहरातील वातावरण हे शिवाजी महाराज यांच्या जयंतीने भरून उठले व जय शिवाजी जय भवानी अशा मोठ्या आवाजात घोषणा देण्यात आले.गोंदिया जिल्हा वंचित बहुजन आघाडी तर्फे सूर्याटोला येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नमन करण्यात आले व संत गाडगे महाराज क्रीडा मंडळ यांच्याकडून सुद्धा तुळजाभवानी मंदिर सुर्याटोला येथून भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सतीश बन्सोड,जिल्हा महासचिव राजू राहुलकर, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विनोदभाऊ मेश्राम,वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरणताई फुले,एसडी महाजन सर,राजू तुपकर सर,शामकुवर सर तसेच यावेळी हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते