Homeराजनितिवंचित बहुजन आघाडी जळगाव पुर्व प्रचार यंत्रणा महत्वाची बैठक रावेर लोकसभा उमेदवार...

वंचित बहुजन आघाडी जळगाव पुर्व प्रचार यंत्रणा महत्वाची बैठक रावेर लोकसभा उमेदवार संजयजी ब्राम्हणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

सोमवार, दि.२२ एप्रिल २०२४ रोजी दु १.00 वा. सुरूवात भुसावळ येथे झाली बैठकीत प्रचार यंत्रणा कशा प्रकारे राबविण्यात येतील यावर जिल्हाध्यक्ष शमिभाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने ठराव झाला,

महाराष्ट्रामद्धे एकूण ४८ लोकसभा जागेवर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्तेक जाती धर्मातील घटकांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्तेक व्यक्तीला अभिव्यक्ति स्वतंत्र आहे. हेच मूल्य बाळासाहेब आंबेडकरांनी जोपासली आहे.

रावेर लोकसभा उमेदवार संजयजी ब्राम्हणे यांच्या प्रचारासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक आयोग यांच्या कडून दिलेल्या पूर्वसूचना तसेच निवडणूक प्रकिया यंत्रणेचे स्वरूप कश्यापद्धतीने असणार आहे.
जनतेसमोर प्रचाराला जाताना वंचित बहुजन आघाडी पक्षाचा जाहीरनामा कश्यापद्धतीने सांगायचं आहे त्याबद्दल जळगाव जिल्हाध्यक्ष शमिभाताई पाटील यांनी उत्तम मार्गदर्शन केले.

बैठकीत रावेर लोकसभा उमेदवार संजयजी ब्राम्हणे यांच्या समवेत युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, रावेर लोकसभा विभागातील जिल्हापदधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष, महासचिव, शहराध्यक्ष,शहर महासचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुलढाणा जिल्हा समन्वयक, सचिन बाऱ्ऱ्हे , प्रकाशपर्व न्यूज

RELATED ARTICLES

Most Popular