Homeराजनितिवंचित बहुजन आघाडी सडक-अर्जुनी तालुक्याची नियोजन व पक्षप्रवेश बैठक संपन्न….

वंचित बहुजन आघाडी सडक-अर्जुनी तालुक्याची नियोजन व पक्षप्रवेश बैठक संपन्न….

दि.24 फेब्रुवारी ला सड़क अर्जूनी येथील राजर्षी शाहू महाराज काॅलेज मध्ये वंचित बहुजन आघाड़ी व वंचित बहुजन युवा आघाड़ी तालुका सड़क अर्जूनी च्या वतीने दिनांक 4 मार्च रोजी होऊ घातलेल्या श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदिवासी बहुजन अधिकार महासभेचे नियोजन करण्यासाठी चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीमध्ये नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी रोहित सातभावे कोसमतोंडी,विनोद रामटेके राष्ट्रवादी काॅग्रेस,शाहीद शेख सड़क-अर्जूनी,मच्छिन्द्र ठाकरे यांनी श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाड़ीत प्रवेश केला.यावेळी त्यांचे मान्यवरांकडून पक्षाचा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वंचित बहुजन आघाड़ी तालुका सड़क अर्जूनी चे अध्यक्ष श्री.सुखदासजी मेश्राम तर मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन यूवा आघाड़ी चे तालुका अध्यक्ष श्री.पुरुषोत्तमजी रामटेके आणि प्रमुख पाहूणे म्हणून श्री.रोहीतजी बोरकर जिला संघटक वंचित बहुजन युवा आघाड़ी जिला गोंदिया व सामाजिक कार्यकर्ते श्री.दिनेशजी पंचभाई उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन तालुका महासचिव श्री.राजुभाऊ मेश्राम व आभार प्रदर्शन श्री.प्रमोद गेडाम जिला प्रसिद्धि प्रमुख वंचित बहुजन युवा आघाड़ी जिला गोंदिया यांनी केले. यावेळी पृथ्वीराज बांबोळे, बाबुलालजी ईलमकार, ओमप्रकाशजी डोंगरे, तालुका संघटक युवा आघाड़ी अनिल ऊके,लुमेंद्र मेश्राम, योगराज साखरे, आदर्श रामटेके,राजु फुले, कमलेश मेश्राम व अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

RELATED ARTICLES

Most Popular