अकोला दि.०६
वंचित बहुजन युवा आघाडीचा युवा महोत्सव तरुणाईच्या उस्फुर्त प्रतिसादाने दणक्यात साजरा झाला.
स्थानिक वेदांत हॉल येथे युवा नेते सुजात आंबेडकर ह्यांचे प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आणि आधुनिक रॅप असा चौफेर कलाकृतीची रेलचेल होती.सांस्कृतिक कार्यक्रम,
सांस्कृतिक आदान प्रदान,कला,संवर्धन,
लोक कलेतील विविध प्रकार सादर करत वंचित बहुजन युवा आघाडी युवा महोत्सवात
“विविधतेत एकता” दर्शवत युवक -युवतींनी प्रचंड जल्लोष केला.
महापुरुषांच्या प्रतिमेंचे पुजन करत वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते सुजातदादा आंबेडकरांनी महोत्सवाची सुरुवात केली.तत्पूर्वी बंजारा डफडे पथक आणि पारंपरिक बंजारा पेहरावातील युवतींनी सुजात आंबेडकर यांचे स्वागत केले.
प्रारंभी कव्वाल लुकमान ताज यांच्या ” चढता सूरज” कव्वालीने वेगळाच समा बांधला.सोबतच बंजारा वेशभूषेत बंजारा वाद्य वादन,बंजारा समाजाचे पारंपरिक नृत्य (बंजारा भाया गृप) ,अंबामातेचे भारुड (साने गुरुजी कला मंच पातुर), पोवडा,
सोपिनाथ महाराजांचा ठावा वादन (भरतपूर लोककला मंच),
भिम कण्या गृप सुकळी नंदापुर यांच्या भिम गीतांवर डान्स,
आणि लिटिल चॅम्प श्रुती भांडे हीचे गीत गायन सादरीकरण करण्यात आले.रिमिक्स वरील युवतीच्या डान्स नंतर
झुंड मुव्ही फेम तसेच एम टिव्ही मधील रियालिटी शो हसल ३ चा उपविजेता
100 RBH सौरभ अभ्यंकर ने
“करदो बेडा पार मेरे भोले बाबा”
“घेऊन टाक”, “हिस्टॉरिक डॉन”
“अमरावती चा पोट्टा” अशी
सामाजिक संघर्षाची आणि विद्रोही रॅप म्हणत युवक युवतींच्या काळजाला हात घातला.ह्यावेळी युवक युवतींनी अख्ख सभागृह डोक्यावर घेतले आणि झिंगाट डान्स केला.
तत्पूर्वी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी संबोधित केले.
बहुजन समाजातील “विविध समाजांच्या सांस्कृतिचे
“विविधतेत एकतेचे” दर्शन युवा महोत्सवात असून बहुजनांच्या संस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अधिकार ह्याचे बरोबर विविध सामाजिक सांस्कृतिक परंपरा व कलाकृती ह्यांचे एका मंचावर सादरीकरण ह्यासाठी युवा आघाडीचे त्यांनी अभिनंदन करीत युवकांनी राजकीय भूमिका ठरविण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
राजकीय पक्षाच्या युवा महोत्सवात अकोला जिल्ह्यातील
अकोला,अकोट,तेल्हारा, बाळापूर,पातुर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर तालुक्यातील तसेच अकोला महानगरातील बहुजन सामाजातील युवक -युवतींचा सहभाग
हा महत्वपूर्ण ठरला.
महोत्सवाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश प्रवक्ते राजेंद्रभाऊ पातोडे, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंजी भिरड,जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,महासचिव मिलिंद इंगळे,जि प उपाध्यक्ष सुनील फाटकर, ,जि प सभापती सौ मायाताई संजय नाईक,,जि प सभापती आम्रपाली खंडारे, सभापती योगीताताई रोकडे, पुष्पाताई इंगळे,युवा आघाडी जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, सम्यक जिल्हाध्यक्ष धिरज इंगळे,
गोपालभाऊ राऊत, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक,पश्चिम महानगर कार्याध्यक्ष मजहर खान,
पश्चिम महानगर महासचिव गजानन गवई,
आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर,
दादाराव पवार,सचिन शिराळे, प्रशिक मोरे, सुबोध डोंगरे, निलेश इंगळे, आनंद खंडारे, मीनल मेंढे,नासरी चव्हाण,निर्भय पोहरे, नितीन वानखडे, श्रीकृष्ण देवकुंभी,नकुल काटे,मिलिंद दामोदर,आकाश जंजाळ,आशिष रायबोले, जय तायडे, निशांत राठोड, जिया शहा,संदीप गवई, नितीन पावडे, मनोज तायडे, चंद्रकांत तायडे,विकास वानखडे,मंगेश देशमुख, सुनील बंड, अमोल जामनिक, अक्षय राठोड, नागेश उमाळे, वैभव खडसे,आकाश जंजाळ,सूरज दामोदर,साहील बोदडे,नम्रता आठवले यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीओम राखोंडे,
आभार प्रदर्शन राजकुमार दामोदर यांनी केले.
मा.शरद इंगोले
अकोला व बुलढाणा जिल्हा समन्वयक
(प्रकाशपर्व न्युज)
संपर्क-9689211382