SC, ST, NT,OBC हा आरक्षण भोगी समाज आहे. त्यांना त्यांच्या टक्केवारी नुसार नोकऱ्या मिळाल्या आहेत.परंतु या नोकऱ्या , ही संधी फक्त आणि फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्ष आणि त्यागामुळे मिळाल्या यांची जाणीव या वर्गातील 99.99 टक्के लोकांना नाही. काहींना समजते पण….मानत नाहीत .बोलत नाही.मान्य देखील करत नाही.कर्मचारी वर्ग सुशिक्षित आणि बुद्धिजीवी असतो.त्यांना आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे हित समजले पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपापल्या जातीच्या संघटना न उभारता. छोट्या छोट्या संघटना न काढता आपली सर्वांची राष्ट्रव्यापी , एकसंघ , अभेद्य अशी संघटना उभारली पाहिजे. त्यात सहभागी झाले पाहिजे.ती संघटना म्हणजेच राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली समता सैनिक दल होय. या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याने आपले उद्धारकर्ते महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संदेश आत्मसात केले पाहिजे.कर्मचारी – अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या संघटना , संस्था काढून त्यांचे कार्यक्रम राबविल्याने होणारा वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळून राजकीय आणि सामाजिक आघाडीवर एकच राष्ट्रव्यापी ताकद निर्माण करण्याच्या कामी आपले लक्ष केंद्रीय केले पाहिजे.परंतु कर्मचारी वर्ग अज्ञानापोटी निर्माण झालेल्या प्रसिद्धीच्या लालचेने,किंवा नेतृत्व आणि इतर लाभाच्या आशेने सर्व जण तुकड्या तुकड्यात किंवा छोट्या स्वरूपात किंवा संकुचित वृत्तीने फक्त स्थानिक पातळीवर कार्यरत राहतो.आणि त्यातच तो आनंदी राहतो.त्यांच्या या कार्याचा समाजाला आणि देशाला देखील काडीचा उपयोग होत नाही.चुकीच्या समजुतीमुळे आपल्या अल्प आनंदासाठी,किंवा समाधानासाठी आपला पैसा वेळ आणि शक्ती वाया जात आहे.हे मात्र या कर्मचारी आणि बुद्धिजीवी लोकांच्या ध्यानात येत नाही.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना खूप महत्वाचा संदेश दिला आहे…..कामगारांनी राजकीय सत्तेवर अंकुश राहील , दबाव ठेवता येईल अशा रीतीने आपली संघटना मजबूत केली पाहिजे. मात्र आपण या कडे दुर्लक्ष केले आहे.आज राजकीय सत्तेचा वापर करून खाजगीकरण राबविले जात आहे. नोकऱ्या नष्ट केल्या जात आहेत. आरक्षणामुळे मिळणाऱ्या संधी नष्ट केल्या जात आहेत.या विरोधात लढले पाहिजे.मात्र कोटीच्या संख्येने असलेला आरक्षण भोगी कर्मचारी या वास्तवाकडे दुर्लक्ष करून आपापल्या संकुचित विचाराने जगत आहे.अज्ञानात सुख मिळते….ते उगाच म्हणत नाही.पण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना नोकरी नसेल , शिक्षण नसेल , संधी नाकारली जाईल त्यावेळी पुन्हा बाबासाहेब आपल्यासाठी लढायला येणार नाहीत.त्यांचे विचार , त्यांचे तत्व , त्यांनी स्थापन केलेल्या संघटना हेच आम्हाला कायम मार्गदर्शक ठरतील.म्हणून आंबेडकरी मिशन मध्ये सामील व्हा.समता सैनिक दल हेच खरे आंबेडकरी मिशन आहे.समता सैनिक दलात सामील व्हा.
लेखक:- मा.धर्मभुषण बागुल,(राज्याध्यक्ष-समता सैनिक दल),+91-9921323281+91-7020558011