डोळे माझे मिटलेले
सगे, सोयरे, मित्र आणि नातलग जमा सारे झालेले.
आक्रोश सारे करिती, मी कोणाचा मलाच नाही कळलेले.
अंगावर हार फुलांनी मला सजवुनी, माझी अंत यात्रा एका वाटेने चाललेली .
कोणी रडत होत , कोणी मी केलेल्या वाईट चांगल्या कर्माचा पाढा वाचत चालले होते.
मला शेवट पर्यंत स्मशानात पोहचविणारे, आपसातही काही बोलत नव्हते.
का कुणास ठाऊक ते गप्प होते.
मी माझा अंतिम प्रवास करताना, मी जगलेल्या जीवनाचा जमा खर्च पाहण्याचा प्रयत्न करू लागलो.
मी खरचं कोणाच्या कामी आलो का.
माझ्यामुळे कोणा कोणाला त्रास झाला असेल का.
मी काय कमवलं, काय गमवल.
माझ्यासाठी रडणारे आणि आक्रोश करणारे ते सारे माझ्या घरचेच असतील का.
मला सरणावर ठेवताना सुध्दा काहीं रडले असतील,
शेवटी मला अग्नी देवून माझी राख होईपर्यंत वाट पाहणारे ही त्यात बरेच होते.
शेवटी घरचे ही सारे मला अग्नीच्या स्वाधीन करून निघून गेले.
काही दिवस माझ्या चांगल्या वाईट कर्माचे हिशोब करत बसले.
हळू हळू मला सारे विसरून गेले.
मी काय घेवून आलो होतो आणि काय सोबत घेऊन निघालो,कोणालाही काही फरक पडणार नव्हता.
पुन्हा एकदा घरातले सारे जमले होते,
मी काही कमवून त्यांच्यासाठी ठेवले का ते तपासून पाहत होते.
लेखक – सुनिल काशिनाथ शेलार, (माकूणसार – पालघर), मो.नं. 9767473919