समता सैनिक दलाची राज्यभर बांधणी करण्यासाठी सम्पर्क अभियान राबविले जाईल असे मागेच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पहिले संपर्क अभियान दिनांक 17 जुलै रोजी राबविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव , मनमाड व नांदगाव या शहरांना भेटी देवून , तेथील स्थानिक, जाणकार ,सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्ते , कर्मचारी , पत्रकार बांधवांशी सांगोपांग चर्चा करण्यात आली.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा समता सैनिक दल स्थापनेमागील उद्देश , स्थापनाकाळ, समता सैनिक दलाने केलेले ऐतिहासिक कार्य , महामानवाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यात आलेली मरगळ , झालेली घसरण आणि आजची परिस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.आज देखील समता सैनिक दलाची अत्यंत गरज असून , बाबासाहेबांच्या तत्त्वावर चालणारे, त्यांच्या लिखित घटनेनुसार काम करणारे , अन्यायाविरोधात लढणारे , जातीय विषमता नष्ट करण्यासाठी अहोरात्र झटणारे , नियमांना बांधील असणारे ,शिस्तबद्ध समता सैनिक दल पुन्हा देशात एकसंघ पणे उभे झाले पाहिजे अशी भूमिका राज्य अध्यक्ष मा.बागुल साहेबांनी मांडली. “समता सैनिक दलाबद्दल जनतेत योग्य माहिती नाही. बरेच गैरसमज देखील आहेत असे यावेळी दिसून आले.परंतु अनेक आंबेडकरी विचाराचे लोकांनी पुन्हा मीटिंग लावतो…तुम्ही पुन्हा या असा सकारात्मक प्रतिसाद दिला.” सकाळी साडे दहा वाजता प्रवासाला सुरुवात केली.मालेगाव येथे दुपारी बारा ते अडीच पर्यंत चर्चा चालू होती.त्यात प्रामुख्याने आयु.बापूसाहेब देवरे , आयु.राजूभाऊ पिंपळे ,आयु.ढोडरे , आयु.हिरालाल निकम यांनी सहभाग घेतला.साडेतीन वाजता मनमाड पोहचलो.तेथे सहा पर्यंत बैठक चालली. त्यात आयु.शैलेश चंदन ,आयु.सुनील पगारे ,आयु.सचिन निरभवणे यांनी सहभाग घेतला.त्यानंतर 7 वाजता नांदगाव पोहचलो व रात्री 9 पर्यंत चर्चा झाली. यावेळी आयु.मनोज चोपडे ,आयु. राजाभाऊ गुढेकर यांनी बरीच चर्चा केली.पुन्हा या….आमच्या गावात तरुणांची मीटिंग लावतो असा शब्द प्रत्येक गावातील उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला. एकूणच हा सम्पर्क दौरा समाधानकारक झाला आहे.रात्री साडे नऊ वाजता परतीचा प्रवास चालू झाला.या दौऱ्याच्या आयोजनासाठी राज्य संघटक आयु.विजय निकम , जळगाव जिल्हाध्यक्ष आयु.किशोर डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.चाळीसगांव तालुका अध्यक्ष आयु.महेंद्र जाधव यांची तब्येत बरी नसतांना देखील त्यांनी पूर्ण दौऱ्यात सहभाग दिला.मनमाड येथील उद्योजक आयु.मिलिंद पगारे यांचे विशेष सहकार्य लाभले.दुसरा संपर्क दौरा लवकरच आयोजित केला जाणार आहे.राज्यातील प्रत्येक जिल्हयात आणि तालुक्यात बाबासाहेबांच्या तत्त्वावर चालणाऱ्या शिस्तबद्ध सैनिकांची कमिटी उभी राहत नाही तो पर्यंत दौरे चालू राहणार आहे…असा आमचा निश्चय आहे.
लेखक:-मा.विजय निकम,(राज्य संघटक-समता सैनिक दल),+91-9921323281,+91-7249024141