जिल्हा गोंदिया येथे मार्शल शुभम कुमार सर यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यातील गोविंदपुर येथे समता सैनिक दलाचे एक दिवशीय बौद्धिक प्रशिक्षण शिबिर नुकतेच संपन्न झाले आहे.सदर समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबिरात 20 सैनिकांनी सहभाग घेतला होता.त्यात प्रामुख्याने मुलींचा देखील सहभाग होता.आंबेडकरी मिशनची सविस्तर परिपुर्ण माहिती या शिबिरात देण्यात आली.त्यामुळे उपस्थित सैनिकांना चांगली प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.संपूर्ण राज्यात अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्याचा समता सैनिक दलाचा प्रयत्न असून त्यास सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी केला.
अश्विन डोंगरे, गोंदिया जिल्हा समन्वयक