दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी चाळीसगांव तालुका कार्यकारीणी निवडसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल सर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष मा.किशोर डोंगरे हे बैठकीचे अध्यक्ष होते.जिल्हा सचिव आयु.नितीन मरसाळे,जिल्हा संपर्कप्रमुख आयु.भाईदास गोलाईत यांनी बैठकीचे आयोजन व संचालन केले.या बैठकीस ज्येष्ठ कार्यकर्ते आयु.स्वप्नील जाधव,ग्रामीण पत्रकार संघटना राज्य प्रमुख आयु.सुरेश कदम,ऍड.तुषार पाटील,दीपक बागुल,गफ्फार शाह,अमजद खान,पत्रकार विजय गवळी,गफ्फार शेख यांचे सह असंख्य शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत 13 मार्च 2024 रोजी समता सैनिक दलाचे वर्धापन दिनानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.नूतन कार्यकारिणीला 2000 गणवेशधारी सैनिकांचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.
वेगवेगळ्या समाजातील 45 पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारिणी निवडण्यात आली असून,आणखी काही पदे रिक्त ठेवण्यात आली आहे. पुढील महिन्यात कार्यकारिणी विस्तार करण्यात येणार आहे. तसेच शहर कार्यकारिणीची निवड 15 दिवसांनी करण्यात येणार आहे.
(नूतन कार्यकारिणी खालील प्रमाणे):-
- अध्यक्ष – महेंद्र यशवंत जाधव (ओझर)
- उपाध्यक्ष- अभिजित निकम (चिंचखेडे), राजेंद्र माळी(लोंजे), सौ.सोनालीताई लोखंडे(चाळीसगांव), मुकेश जाधव पाटील(पिंपळवाड म्हाळसा), राजेंद्र अहिरे (रांजणगाव), जिवन जाधव (भऊर)
- सचिव – सचिन गांगुर्डे (टाकळी प्र.चा.)
- सहसचिव- महेंद्र निकम (पाटणा), गणेश बागुल (राजदेहरे), विशाल पगारे (चाळीसगांव), यशवंत दाभाडे (ब्राह्मणशेवगे), निलेश शिरसाठ (उंबरखेड)
- संपर्क प्रमुख- बाजीराव घोडेस्वार(दहीवद), वाल्मीक निकम (खेर्डे), मनोज जाधव (ओझर), चिंतामण निकम (शिरसगाव), सौ.मायाताई अहिरे (रांजणगाव), सिध्दार्थ मोरे (पिंपरखेड) लाला परदेशी (बाणगाव), गयास शेख (चाळीसगांव), विष्णू जाधव (चाळीसगांव)
- संघटक – राहुल गुजर (ओझर), साईनाथ पटाईत (गणेशपुर) छोटू निकम (चिंचखेडे), वाल्मीक आल्हाट(चिंचखेडे), रतन अहिरे (रांजणगाव), रविंद्र जाधव (चाळीसगांव), शिवाजी शिंदे (चाळीसगांव) सुभाष बोरसे (माळशेवगा), राहुल जाधव (शेवरी), चंद्रकिरण मरसाळे (दस्केबर्डी), नितीन जवराळे (चाळीसगांव), सिताराम जाधव (ओझर), श्रावण बागुल (राजदेहरे), जिभाऊ अहिरे (उंबरखेड),अनिल मोरे (बाणगाव), सागर पगारे (भऊर), शेखर यशोद (पिलखोड), मुकुंदा बागुल, (चिंचगव्हाण)
- कोषाध्यक्ष- सी.बी.मोरे सर
- प्रसिद्धीप्रमुख- बाबा पगारे
- मीडिया प्रमुख- सुरेश कदम (पत्रकार दै.भास्कर)
- कायदे विषयक सल्लागार – ॲड.तुषार पाटील (पिंपळवाड म्हाळसा)
मा.सम्यक गांगुर्डे
धुळे,जळगाव जिल्हा समन्वयक
मो.नं-9420224641