दि.6एप्रिल
जळगाव येथे समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष आयु.किशोर डोंगरे यांच्या पुढाकाराने 6 एप्रिल 2024 रोजी आयोजित केलेले पाचोरा येथील दोन दिवसीय निवासी बौद्धिक व शारिरीक प्रशिक्षण शिबिर दिनांक 7 एप्रिल 24 रोजी संध्याकाळी संपन्न झाले.सदर शिबिरास राज्याध्यक्ष मां.धर्मभुषण बागुल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व प्रबोधन केले.राज्य संघटक मा.विजय निकम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.या शिबिरास पाचोरा,भडगाव,चाळीसगांव,जळगाव,धुळे,एरंडोल,जामनेर,पारोळा,जामनेर,सायगाव,चोपडा,यावल या 12 तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व सक्रिय सैनिक उपस्थित होते.पाचोरा तालुका पदाधिकाऱ्यांनी नियोजन करण्यास विशेष परिश्रम घेतले.या शिबिरात मिळालेल्या मार्गदर्शनामुळे उपस्थित सैनिकांचा उत्साह वाढला असून त्या भागात समता सैनिक दलाचे प्रचारकार्य जोमाने करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी बोलून दाखविले.
जळगाव जिल्हा समन्वयक,सचिन बार्हे,मो.नं-7066668723