Homeप्रदेशसमता सैनिक दल - संपर्क अभियान अंतर्गत चाळीसगांव तालुका जळगाव जिल्हा ग्रामीण...

समता सैनिक दल – संपर्क अभियान अंतर्गत चाळीसगांव तालुका जळगाव जिल्हा ग्रामीण भागात संपर्क दौरा आणि बैठका संपन्न…….

दिनांक 21 जुलै 2024 रविवार रोजी चाळीसगांव तालुक्यातील ग्रामीण भागात राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांनी संपर्क दौरा केला. यात 4 गावात बैठका घेण्यात आल्या.वास्तविक 21 जुलै रोजी समता सैनिक दलाचे नागपूर येथील केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम होता.परंतु नागपूर येथे शासनाने अति वृष्टीचा इशारा दिल्याने आयोजकांनी सावधानता बाळगुन हा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा दिवस वाया जाऊ नये म्हणून हा सम्पर्क दौरा तातडीने आयोजित करण्यात आला. तालुका सहसचिव आयु. विशाल पगारे आणि तालुका संघटक आयु.रवींद्र अहिरे यांनी या कामी विशेष परिश्रम घेतले आणि पूर्ण वेळ दौऱ्यात सहभाग दिला. या दौऱ्यात नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगांव तालुक्यातील उपखेड येथे दुपारी 1 वाजता बैठक घेण्यात आली. उपखेड येथे लवकरच एका सभेचे आयोजन करण्यात येईल.त्यासाठी जवळपासचे 25 गावांना निमंत्रित करण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. तालुका संघटक आयु.राजू जाधव , कालिदास बागुल , चिंधा बागुल,समाधान बागुल यांनी चर्चेत भाग घेतला. दुपारी साडे तीन वाजता पिंपरी बु.प्र.चा येथे दुसरी बैठक घेण्यात आली.यावेळी या परिसरातील 10 गावांची एकत्रित बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.आयु.योगेश निकम,प्रकाश निकम , भिकन खैरे , अनिल निकम यांनी बैठकीचे आयोजन केले होते. संध्याकाळी 6 वाजता टाकळी प्र.दे.येथे बैठक घेण्यात आली. याठिकाणी दलाचे माहिती पत्रकाचे वाचन आयु. मांगो बागुल यांनी केले.आयु.रितेश निकम सोमनाथ नीकम,गौतम निकम यांनी बैठकीसाठी परिश्रम घेतले.पुन्हा नियोजन करून जाहीर सभा घेण्याचे ठरविण्यात आले. संध्याकाळी 7:30 वाजता उंबरखेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बैठक घेण्यात आली.तालुका संघटक आयु. जिभाऊ अहिरे आणि आयु.निलेश शिरसाठ यांनी बैठकीचे नियोजन केले होते.या दौऱ्यात ग्रामीण भागात प्रत्येक गावात दलाची कमिटी तयार करण्यात यावी, गणवेशधारी सक्रिय सैनिक तयार व्हावे , दलाची सभासद नोंदणी करण्यात यावी यावर भर देण्यात आला.समता सैनिक दलाची सामाजिक आणि राजकीय जबाबदारी आणि राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलासाठी निश्चित केले कार्य आणि ध्येय याबाबत मुद्देसूद माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या हितासाठी प्रचंड कार्य केले आहे. तसेच सातत्याने सर्व भारतीयांच्या कल्याणाचा विचार प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगाने समता सैनिक दल हे सर्व जाती-धर्मासाठी खुले असुन , सर्व भारतीयांनी जात – पात आणि धर्मभेद विसरून समता सैनिक दलात सहभागी व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी तळमळीने प्रयत्न करावे असे आवाहन राज्य अध्यक्षांनी केले.रात्री 9 वाजता हा दौरा पूर्ण झाला.

विशाल पगारे,तालुका सहसचिव SSD चाळीसगांव (सम्पर्क – 9921323281 – 7020558011)

RELATED ARTICLES

Most Popular