आजदि.11/7/2024 रोजी जळगाव येथे समता सैनिक दलाची राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात समता सैनिक दलाची बांधणी करणे,नूतन तालुका कार्यकारिणी निवड करणे,नविन सैनिकांचा समावेश करणे जेणेकरून दल वाढेल व इत्यादी महत्त्वाच्या विषयावर चर्चा व मार्गदर्शन
राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल साहेब यानी यावेळी केले.
सदर बैठकीचे आयोजन समता सैनिक दलाचे राज्य संघटक आयु.विजय निकम सर (जळगाव) यांनी केले होते.जळगाव जिल्हा अध्यक्ष आयु.किशोर डोंगरे हे बैठकीचे अध्यक्षस्थानी यावेळी उपस्थित होते.ज्यात काही महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे घेण्यात आले आहेत.
१)जळगाव जिल्ह्यात राज्य अध्यक्ष मा.नानासाहेब धर्म भुषण बागुल साहेब यांच्या नेतृत्वात जुलै महिन्यात प्रत्यक्ष गावागावात जाऊन संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
२)पहिले संपर्क अभियान जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात राबविण्याचे निश्चित झाले असून सलग दोन दिवसात किमान 12 ते 15 गावांना भेटी देवून नागरिकांशी समता सैनिक दल व एकंदरीत आंबेडकरी मिशन बाबत चर्चा केली जाणार असून,या मिशन मध्ये सामील होण्याचे आवाहन केले जाणार आहे.
३)या संपर्क अभियानाची आयोजनाची जबाबदारी राज्य संघटक आयु.विजय निकम यांच्याकडे देण्यात आली आहे.
४)त्याचप्रमाणे प्रत्येक जळगाव जिल्ह्यातील तालुक्यात ग्रामीण भागात जाहीर सभा आयोजित करण्याचा देखील निर्णय यावेळी झाला आहे.
५)त्यानुसार जळगाव ,यावल , चोपडा , पाचोरा ,जामनेर , चाळीसगांव येथील भागात या प्रचार सभा आयोजित केल्या जाणार आहेत.
६)या कामी राज्य संघटक आयु. विजय निकम आणि जिल्हाध्यक्ष आयु.किशोर डोंगरे यांनी जबाबदारी घेतली आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेच्या विरोधात लढण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली आहे. समता सैनिक दलात सर्वांना सहभागी होता येते. समता सैनिक दलात जात – धर्म – वंश यावरून भेदभाव केला जात नाही.ज्यांना या देशात सर्वांगीण समता प्रस्थापित झाली पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा आहे.त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात सहभागी झाले पाहिजे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे….की, ” गाव तिथं शाखा …..घर तिथं सैनिक ” निर्माण केला पाहिजे.
समता सैनिक दल बंद पडू देऊ नका….
आपली संघटना मजबूत करा…
अन्याय विरोधात लढण्यासाठी समता सैनिक दलात सहभागी व्हा..!….असे विचार राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांनी मांडले.
सदर बैठकीत चोपडा, यावल, सावदा ,
फैजपुर जामनेर प्रभारी तालुका प्रचारकांची नेमणूक करण्यात आली
या बैठकीस जळगावचे समता सैनिक दलाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
समता सैनिक दल (संस्थापक – राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर)जळगांव जिल्हा शाखा आयोजित आढावा बैठक संपन्न !!
RELATED ARTICLES