Homeराजनितिसम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या हिंगोली जिल्ह्याच्या निरिक्षक पदी आयु.नागेशशदादा सातपुते यांची नियुक्ती

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या हिंगोली जिल्ह्याच्या निरिक्षक पदी आयु.नागेशशदादा सातपुते यांची नियुक्ती

वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन हिंगोलीच्या निरीक्षक पदी आयु.नागेश सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नागेश सातपुते यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असुन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर लढत न्याय मिळवून दिला आहे.फुले,शाहु,आंबेडकर यांचे विचार युवकांमधे पेरण्याचे काम ते करत आहेत.

सम्यक विद्यार्थी आंदोलन लातूरचे जिल्हाध्यक्ष असतांना त्यांनी व त्यांच्या टीमने कंत्राटी भरतीच्या विरोधात मोर्चा काढला होता.त्या मोर्चाची दखल राज्य सरकारने घेऊत कंत्राटी भरती रद्द केली होती.त्यांनी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विविध पदांवर कार्य केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अंजलीताई आंबेडकर व मा.महेश भारतीय सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर मित्र परिवारासह विविध क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular