लहान असतांना माझे वडिल मला दीक्षाभूमी ला परम पूज्य डॉ. बाबासाहेब यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता 14 अक्तूबर ला नेहमी घेवून जात असतं. दीक्षाभूमी म्हटलं म्हणजे, ती मला माझी आपली वाटायची. मला माझ्या हक्काची जागा वाटायची. गगनात झेप मारण्या करिता उर्जचे केंद्र बिंदु दीक्षाभूमी असायची आनी नेहमी असणार. जसे-जसे शहाणपण वाढत गेले प्रश्न पडण्यास सुरुवात झाली, “दीक्षाभूमी स्मारक समिती” म्हणजे नेमके काय? “दीक्षाभूमी स्मारक समिति” चे दीक्षाभूमीत काय काम? “दीक्षाभूमी स्मारक समिती” मध्ये किती सभासद आहेत? आनी त्यांचा आपसी करार नामा काय आहे? सचिव पद नेहमि या मंडळी कड़ेच का असते. दीक्षाभूमी बाबासाहेबांची मानतो, तर डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांचा परिवार ( घराणे) “दीक्षाभूमी स्मारक समितीत” सम्मिलित का नाही? दूसरा, मिराताई आम्बेडकर द्वारा संचालित भारतीय बौद्ध महासभा सलग्न का नाही. हे मनात प्रश्न उद्भावत होते. कारण जर आम्हाला सर्व घराने चालत असतिल तर, आम्बेडकर घराने आम्हाला का चालत नाही प्रश्न आहे?
१४ अक्टूबर १९५६ ला परम पूज्य डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांनी हिंदू धर्माचे बंधन तोडून, जगात नवीन क्रान्ति केली ३.६५ लाख समर्थक यान्ना सोबत घेवुन दीक्षाभूमी वर बौद्ध धम्म स्वीकारले. म्हणजेच दीक्षाभूमी ही क्रांति भूमि आहे. दीक्षाभूमी मधुन “बौद्ध धम्माचे” वारे “बौद्ध धम्म” संपूर्ण जगात प्रस्तापित करण्याकरिता पसरायला हवे होते, परंतु हे वारे जानीव पूर्वक या “दीक्षाभूमी स्मारक समिति” ने वाहु दिले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ओबीसी धर्मातर चे प्रणेते हनुमंत उपरे काका ” ओबीसी बुद्ध धम्माच्या” वाटेवर, हा उपक्रम हनुमंत उपरे काका यांनी राबवला. पहिले ” ओबीसी बुद्ध धम्माच्या” वाटेवर प्रोग्राम दीक्षाभूमी वर पार पडला व असंख्य ओबीसी भाऊ बंधु यानी “बुद्ध धम्म” स्वीकारला. परंतु कालांतराने असे काय झाले “ओबीसी बुद्ध धम्माच्या” वाटेवर या कार्यक्रमाला या स्मारक समिती ने दीक्षाभूमी ची जागा देण्यास नकार दिला? “बौद्ध धम्माचे” वारे वाहण्यास का थांबवले. कोणाच्या सांगण्या वरून धर्मांतराचे कार्यक्रम रद्द केले, स्मारक समिती ने स्पष्टीकरण द्यावे.
दूसरा, मुद्दा दीक्षाभूमी वर ” बुद्धा फेस्टिवल” नावाचा अत्यंत छान उपक्रम
राबवन्यात येत होता, ज्ञानवर्धक आनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद लहान- मोठे घेत असत. ” बुद्धा फेस्टिवल” या कार्यक्रमाला सुधा स्मारक समिती ने जागा देन्यास नकार दिला. माहिती प्रमाने सुधीर फुलझेले सचिव होते.
मनात प्रश्न उद्भावले “दीक्षाभूमी” जनतेची की दीक्षाभूमी स्मारक समिती ची??
पवित्र दीक्षाभूमी वर एके-वेळी साइकिल स्टैंड बघनारा विलास गजघाटे कसे काय दीक्षाभूमी वर वर्चस्व गाजवन्यास सुरूवात करू शकतो. मागिल ७ ते ८ वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमरावजी आंबेडकर दीक्षाभूमी ला आमच्या ग्रुप सोबत सदिच्छा भेट देन्यास आले असता, सोबत असलेल्या लोकांकडून त्यांचा जयजयकार करन्यात आले. भीमरावजी आंबेडकर दीक्षाभूमी ला भेट देत असतांना “तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब की जय” या उद्घोषणा व्दारे जयजयकार करण्यात आले असता, हा विलास गजघाटे दीक्षाभूमी वर या उद्घोषणा इथे चालनार नाही असे भीमरावजी आंबेडकर यांच्या समोर म्हणतो, मग दीक्षाभूमी वर कुणाची जय-जयकार करावी सांगावे?? ह्या माणसाला असे बोलन्यास बळ कोनी दिले? उपासक उपासिका यानी उत्तर सांगावे.दीक्षाभूमीच्या आतिल परिसरात दर्शन घेतल्या नंतर, भीमरावजी आंबेडकर बाहेर आले असता बोधिवृक्ष जवळ विलास गजघाटे भीमरावजी आंबेडकर यांच्यासी उभे-उभे बोलत होता, परंतु ऑफिस मध्ये बसुंन चर्चा करण्याचे साधे निमंत्रण भीमरावजी आंबेडकर यान्ना दिले नाही. विलास गजघाटे स्व:ताला काय समजतो जनतेश सांगावे??
यावरुन कसे समजनार दीक्षाभूमी जनतेची आहे.
मागिल वर्षी,पर राज्यातुन आथक परिश्रमाणे चक्रवर्ती सम्राट राजे अशोक यांची भव्य मूर्ती दीक्षाभूमी ला सुपुर्द करण्यात आली. चक्रवर्ती सम्राट राजे अशोक यांची भव्य मूर्ती चे अनावरण न करता, स्तुपा च्या आत एका बाजूला उभी करून ठेऊन दिले. जसे की ती मूर्ती नकोसी आहे. ऐवढी उदासीनता स्मारक समिती का करत आहे किंवा कोणाच्या दडपनाखाली उदासीनता दाखवत आहे सांगावे.
दसरा ला संपूर्ण जगभरातुन लोक दीक्षाभूमी ला परम पूज्य डॉ. बाबासाहेब यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता येत असतात, काही लोक २ ते ३ दिवसा आधीच, दीक्षाभूमी ला पोहचतात परंतु दीक्षाभूमी स्मारक समिती दीक्षाभूमी वर आगंतुक मंडली करीता कुठलेच अरेंजमेंट करताना दिसत नाही. उपासी-तापासी आलेल्या लोकांच्या नियोजनाकरिता नागपुर सुसज्ज असतेच, परंतु दीक्षाभूमी स्मारक समिती खान-पानाची पर्यायी व्यवस्था सुद्धा करत नाही. दीक्षाभूमी वर बाथरूम ला सुद्धा गैर सोय निर्माण होते. मग ही दीक्षाभूमी स्मारक समिती करते तरी काय? कळत नाही
दूसरी कड़े, स्टेज वर समाजाला प्रबोधन करण्यासाठी, समाजातील प्रबोधनकारी व्यक्तिना निमंत्रण न देता राजनीतिक लोकांना प्रमुख पाहुने म्हणून बोलावतात आनी स्वतः आपली पाठ थोपतात. याच्यात आपली धन्यता मानतात.
दीक्षाभूमी मुख्य गेट कड़े, वर्षा नू वर्षापासुन विविध दुकानाकारिता पंडाल लावून, जागा दिली जात असे, परंतु मागील काही वर्षापासून सिक्योरिटी च्या नावाखाली दुकानाकारिता पंडाल देन्याचे टाडले जात होते. जाब विचारण्यासाठी नागपुर मधिल चडवड़ीतिल युवा मंडळी मित्रांना सुधीर फुलझेले यांचे घर गाठावे लागले. तेव्हा कुठे पंडाल लावण्याची परमिशन मिडाली. म्हणजे या दीक्षाभूमी स्मारक समिती वर समाजाचे दड़पन असणे खुपच गरजेचे आहे. समाजाची भीति या स्मारक समिती वर असने खुप गरजेच आहे.
दीक्षाभूमी स्मारक समिती, दीक्षाभूमी करीता एक्स्ट्रा जागा वाढविण्याच्या पर्याय न शोधता, जागा कमी कमी करत जात आहे. एका भागाला पेड़ पार्किंग ची जागा,तर दूसरी कड़े क्रिकेट ग्राउंड. आता अवाढव्य पार्किंग प्रोजेक्ट च्या नावाखली जागेचा दुरुऊपयोग की सदुपयोग हे स्मारक समिती ने ठरवावे.
सर्वात, दुखदायक म्हणजे पावसात स्तूपाच्या आतमधिल आंतरिक परिस्थिति पीड़ादादायक आहे, म्हणून दीक्षाभूमी स्मारक समिती बर्खास्त करण्यात यावि असे मनातुन वाटते.
मा.रजनिश मेश्राम,नागपुर जिल्हा समन्वयक,प्रकाशपर्व न्युज